Posts

Showing posts from June, 2025

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

मराठा राज्यव्यापी बैठक: आंतरवाली सराटीतून मुंबई आंदोलनाची हाक

Image
लाखोंच्या उपस्थितीत ऐतिहासिक बैठक; मनोज जरांगे पाटलांचा एल्गार वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        २९ जून २०२५ रोजी आंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा समाजाच्या नियोजनासाठी एक भव्य व ऐतिहासिक राज्यव्यापी बैठक पार पडली. लाखोंच्या संख्येने उपस्थित मराठा बांधवांनी ही सभा मराठा एकजुटीचा शक्तिप्रदर्शन ठरवली. या बैठकीतून समाजाने आगामी मुंबई आंदोलनासाठी रणनिती ठरवली असून, आंदोलनाच्या नेतृत्वाची धुरा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा समर्थपणे सांभाळली. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व संदेश    मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणातून मराठा समाजाच्या लढ्याची दिशा स्पष्ट केली: "इतके दिवस आंदोलन चालू असतानाही मराठा समाज मागे हटलेला नाही. ही चिकाटीच आपल्या विजयाचे कारण ठरणार आहे," असे ते म्हणाले. "व्हाट्सॲप, फेसबुकवर पाठिंबा देण्याची वेळ संपली आहे. आता थेट मैदानात उतरण्याची वेळ आली आहे." "२७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आंतरवाली सराटीहून निघून, २९ ऑगस्ट रोजी कोट्यवधी मराठ्यांसह मुंबईत दाखल होणार आहोत." "राजकारणी निवडणूक जिंकण्यासाठी झटतात, पण समाजास...

घनसावंगी- युवकाचे अपहरण; गावठी कट्टा व कु-हाडीचा धाक दाखवत केले अपहरण

Image
  जुन्या वादाच्या कारणावरून केले अपहरण  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बाजार समितीसमोर काल रात्री १० वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादाच्या कारणावरून एका युवकाचे चार जणांच्या टोळीने गावठी कट्टा आणि कु-हाडीचा धाक दाखवत अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.      फिर्यादी सुभाष लळितराव आर्दड ( रा. राजाटाकळी, ता. घनसावंगी) यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.यातील संशयित आरोपी हरी तौर याने गावठी कट्ट्याचा धाक दाखवला, तर खन्ना आर्दड याने कु-हाडीने धमकावले. त्यानंतर जबरदस्तीने त्याला गाडीत बसवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अज्ञात ठिकाणी घेऊन गेले.असे तक्रारीत म्हटले आहे.     घटनेनंतर लगेचच पोलीस निरीक्षक राठोड, सपोनि खरात, पोउपनि पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध सुरू आहे. अद्याप कोणत्याही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.

पोलीस खाते हादरलं ! कार अंगावर घालून PSI ची निघृण हत्या

Image
आधी कारने उडवलं, मग धारदार शस्त्राने सपासप वार: तीन जण अटक.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        अमरावती शहरात एक खळबळजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वलगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक (PSI) अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची अतिशय निघृण हत्या करण्यात आली. ही घटना अमरावतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.      मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल कलाम हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका फोर व्हिलरने उडवलं. अपघात झाल्याने ते रस्त्यावर कोसळले. त्याच क्षणी सुमारे पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. पोटावर आणि छातीवर एकामागोमाग एक वार करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.     जखमी अवस्थेत कलाम यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण अमरावती शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.     य...

छत्रपती संभाजीनगर हादरले! महिला कीर्तनकार यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात स्थित सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात राहणाऱ्या लोकप्रिय महिला कीर्तनकार संगीताताई अण्णासाहेब पवार (वय अंदाजे ४५) यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. आश्रमाजवळील एका शेडमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समजताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, तपासासाठी फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.    संगीताताईंना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या धमक्यांबाबत त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीताताईंना आतापर्यंत तीन वेळा अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र, याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.     मिळालेल्या माहितीनुसार, संगीताताई पवार या धार्मिक आणि कीर्तन सेवा क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांच्या किर्तनात समाजप्रबोधनाची दिशा असायची. त्यामुळे समाजातील का...

शेतातील डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

Image
अवघ्या सात व पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू:गावावर शोककळा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात खेळताना दोन निरागस बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मोढा बु. गावात घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले आहेत.       मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या बालकांची नावे हर्षदा गणेश कांबळे (वय ७) आणि रुद्र गणेश कांबळे (वय ५) अशी असून, हे दोघेही ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील होते. रविवार दुपारी घराजवळील शेतशिवारात ते खेळत असताना एका मोठ्या डबक्यात ते बुडाले. काही वेळातच त्यांचा शोध घेणाऱ्या नातेवाइकांना ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.     या दुःखद घटनेने कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक सं...

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर, पण अनिश्चिततेचे सावट कायम

Image
अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर; लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा वाढली वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली आहे. दहावीचा निकाल लागून दीड महिन्याहून अधिक काळ उलटल्यानंतरही अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी (Regular Round-1) अद्यापही जाहीर झालेली नाही. परिणामी, राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक या यादीच्या प्रतीक्षेत असून त्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी ११ वाजता ही यादी जाहीर होणार असल्याची अधिकृत माहिती दिली गेली होती. मात्र आता ही यादी पुढील चार ते पाच दिवस लांबणीवर टाकण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही यादी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तरी प्रसिद्ध होते का, याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. अद्याप शिक्षण संचालनालयाकडून कोणतेही स्पष्ट किंवा लेखी निवेदन प्राप्त झालेले नाही. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर     दरम्यान, शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यां...

बीड जिल्ह्यात काळीमा फासणारी घटना: कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार !

Image
  उमाकिरण व ओम क्लासेसचे विजय पवार आणि प्रशांत खटोकर यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राची विश्वासार्हता डागळवणारी आणि समाजाला हादरवून सोडणारी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उमाकिरण आणि ओम कोचिंग क्लासेसचे शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खटोकर या दोघांवर अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्यावर POCSO (Protection of Children from Sexual Offences) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      मुलींच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कठोर कायद्याखाली या दोघांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे बीडमधील पालक आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड संताप व अस्वस्थता पसरली आहे. "शिक्षक" ही पदवी श्रद्धेची असते, पण काही विकृत प्रवृत्तीचे लोक या पदाचा गैरवापर करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची बदनामी करत आहेत, हे दुर्दैव आहे.     या घटनेचा समाजातील विविध स्तरातून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. अनेकांनी यासाठी सोशल मिडियावर तसेच प्रत्यक्षातही निषेध आंदोलन सुरू केले आह...

घनसावंगी गोळीबाराने हादरले

Image
  जुन्या भांडणाच्या कारणावरून रागाच्या भरात गावठी कट्ट्याने झाडली गोळी  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील घनसावंगी काल गोळीबाराने हादरले जुन्या भांडणाच्या कारणावरून रागाच्या भरात एकाने गावठी कट्ट्याने झाडल्याची घटना समोर आलीय.       पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील शिंदेवडगाव शिवारात दिनांक २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास विकास जंडे यांच्या शेतातील आखाड्यावर तो उपस्थित होता. यावेळी आरोपी महेश येवले (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शिंदेवडगाव) याने जुन्या भांडणाच्या कारणावरून रागाच्या भरात ऋषीकेश याच्या दिशेने गावठी कट्ट्याने गोळी फायर केली.     गोळी ऋषीकेशच्या तोंडावर व नाकावर लागल्याने तो जखमी झाला. या हल्ल्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. हा प्रकार घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. गुन्हा दाखल व तपास कार्यवाही     सदर घटनेबाबत दिनांक २६ जून रोजी रात्री घनसावंगी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 318/2025, कलम 109 भा.दं.वि. सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी...

घनसावंगी -चाकरवाडीला देवदर्शनासाठी पतीसोबत जात असताना अपघात पत्नीचे दुर्दैवी निधन

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण          घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथील मीना भारत राऊत (वय ४२) यांचे २४ जून रोजी दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्या आपल्या पती भारत राऊत यांच्यासोबत चाकरवाडी येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला.         प्राप्त माहितीनुसार, दोघे पती पत्नी दुचाकीवरून रस्त्यात जात असताना अचानक तोल जाऊन मीना राऊत खाली पडल्या व गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर तातडीने त्यांना बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.      त्यांच्या जाण्याने राऊत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. २५ जून रोजी मुद्रेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

CBI ची देशभरात मोठी कारवाई !

Image
  ऑपरेशन चक्र-५ अंतर्गत सायबर फसवणुकीतील ८.५ लाख म्यूल बँक खाती उघडकीस, ९ आरोपी अटकेत वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        दिनांक २६ जून २०२५ रोजी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने सायबर फसवणुकीविरोधात देशभरात एक मोठी मोहीम राबवत, ‘ऑपरेशन चक्र-५’ अंतर्गत राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये ४२ ठिकाणी एकाच वेळी धाडसत्र पार पाडले. या कारवाईत सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्यूल बँक खात्यां’चा तपास करण्यात आला असून, एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्यांवर निर्णायक कारवाई      CBI ने विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे आणि प्राथमिक पडताळणीनंतर एक समन्वित शोध मोहीम राबवली. यामध्ये डिजिटल अटक घोटाळे, बनावट जाहिराती, गुंतवणूक फसवणूक, यूपीआय आधारित फसवणूक यामध्ये वापरल्या जाणाऱ्या म्यूल खात्यांचा वापर स्पष्टपणे उघड झाला. काय आहेत 'म्यूल खाती'?    म्यूल खाती म्हणजे अशा बँक खाती जी फसवणुकीच्या रकमेचा प्रवास सुलभ करण्यासाठी उघडली जातात. यात अनेकदा सामान्य नागरिकांची किंवा बनावट माहिती वापरून खाती उ...

विभागीय आयुक्तांच्या सहा समित्या स्थापन

Image
  अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        महसूल विभागाची कार्यक्षमता वाढविणे, विभाग अधिक लोकाभिमुख करणे आणि प्रशासन अधिक परिणामकारक बनविणे या उद्देशाने राज्य शासनाने महसूल विभागातील विविध सुधारणा प्रस्तावित करत सहा विषयवार समित्यांची स्थापना केली होती. या सर्व समित्यांचा एकत्रित अहवाल "महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका" या स्वरूपात मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नुकताच सादर करण्यात आला.      राज्यातील सहा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समित्यांनी खालीलप्रमाणे विशिष्ट विषयांवर अभ्यास करून उपाययोजना सुचविल्या: 1. समिती क्र. 1 – विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग विषय – महसूल प्रशासनाच्या अध्यक्षतेखाली गठीत विविध समित्यांचा आढावा घेऊन सुसूत्रीकरण करणे. या समितीने महसूल विभागातील विविध पातळ्यांवर कार्यरत असलेल्या समित्यांचे कार्य समन्वित करून त्यांचे पुनर्रचना प्रस्ताव मांडले. 2. समिती क्र. 2 – विभागीय आयुक्त, अमरावती विभाग विषय – विविध संवर्गातील अधिकारी/कर...

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलैदरम्यान मुंबईत

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा ३० जूनपासून सुरू होणार असून, १८ जुलैपर्यंत ते चालणार आहे. अधिवेशनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील विविध वरिष्ठ मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.      या बैठकीस विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.      या अधिवेशनात राज्यातील महत्त्वाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थि...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार- प्रहारचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंढे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Image
सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची दिली धमकी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण          जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जांब समर्थ कोठाळा (ता. घनसावंगी) येथील ह.मु. सुरंगे नगर अंबड येथे राहणाऱ्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहन शेषराव मुंढे यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमाचे नाटक करून शरीरसुखाचा गैरफायदा      फिर्यादी महिला आपल्या आई-वडील व मुलासह अंबड येथील सुरंगे नगरमध्ये एका खोलीत किरायाने राहते. आरोपी मोहन मुंढे व पीडित महिला यांची पूर्वीपासून ओळख होती. त्यातूनच दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. एक दिवस आरोपीने महिलेच्या भावना खेळवत तिच्यावर प्रेम असल्याचे भासवले व लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सुरुवातीला दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि आरोपीने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. लग्नास नकार देत धमकी दिली ...

तीर्थपुरी पोलिसांना चकमा देत DYSP कार्यालयाची कारवाई - ६.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Image
भद्रायणी नदीत अवैध वाळू उपसा व वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडला; तीर्थपुरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण          अंबड तालुक्यातील रुई येथील भद्रायणी नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर अखेर पोलिसांनी कारवाईची झडप टाकली आहे. तीर्थपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात पोलिस अपयशी ठरत असतानाच, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अंबड यांच्या पथकाने २४ जून रोजी सकाळच्या सुमारास रुई येथील नदीपात्रावर छापा टाकत ट्रॅक्टरसह वाळू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना रंगेहात पकडले. या कारवाईत अंदाजे ₹६,४३,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे तीर्थपुरीचे सपोनि साजीद अहमद यांच्या दुर्लक्षामुळे बोकाळलेल्या अवैध धंदे, चोरीच्या घटना, अवैध वाळू उपसा व वाहतूक, वाहतुकीची कोंडी यात अनेकवेळा झोपेचे सोंग घेत असलेल्या कारभारबद्दल मला पहा अन् पानफुल वाहा असेच झाल्याचे दिसून येते.       कारवाईदरम्यान महिंद्रा कंपनीचा अर्जुन ५५५ मॉडेलचा ट्रॅक्टर (विन...

गोदाकाठच्या वाळू माफियांवर एसडीएम यांचा छापा:गोदावरी नदीपात्रात अवैध उत्खननाची उघड

Image
  वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांची कारवाई; दोषींवर गुन्हे दाखल होणार-सातबाऱ्यावर बोजा ठेवण्याचीही तयारी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ व मुद्रेगाव येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करत उपविभागीय अधिकारी प्रभारी विजय चव्हाण यांनी सोमवारी (दि. २४ जून) दुपारी अचानक पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या आगमनाची भनक लागताच वाळू माफिया व त्यांचे ट्रॅक्टर केनिया चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला.       प्रभारी उपविभागीय अधिकारी चव्हाण यांना काही ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंबड उपविभागीय कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी तत्काळ घनसावंगी प्रभारी तहसीलदार संतोष इथापे व त्यांच्या सहकाऱ्यांसह पथक तयार करून मौजे मंगरुळ व मुद्रेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्र व शेतांतून अवैधरीत्या काढण्यात आलेल्या वाळूची पाहणी केली.      पाहणीदरम्यान शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू साठवलेली असल्याचे निदर्शनास आले. हे सर्व वाळू उत्खनन नदीपात्र...

अंगावर ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा मृत्यू , एक गंभीर जखमी

Image
  रोटावेटर घसरल्याने ट्रॅक्टरचा तोल सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण          अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव परिसरात आज (दि. २४ जून) दुपारी सुमारास ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर एक १४ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव अण्णासाहेब नामदेव गव्हाणे (वय ३८) असून, जखमी मुलाचे नाव गोपाल विष्णु सिंग पवार (वय १४) असे आहे.       ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घुंगर्डे हादगाव–तिर्थपुरी रोडवरील चारी क्रमांक २२ येथे घडली. ट्रॅक्टरवरील रोटावेटर (शेतकामासाठी वापरण्यात येणारे यंत्र) घसरल्याने ट्रॅक्टरचा तोल सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला. यामध्ये अण्णासाहेब गव्हाणे हे ट्रॅक्टरखाली दबून जागीच ठार झाले, तर गोपाल पवार गंभीर जखमी झाला.       घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली आणि जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. अण्णासाहेब गव्हाणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला असून, जखमी गोपाल पवार याला तात्काळ अंबड येथील उपज...

घनसावंगी-अंबड रोडवर भीषण अपघात; शेतकरी युवक ठार

Image
  १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        घनसावंगी ते अंबड रोडवरील बोलेगाव पाटीजवळ काल (दि. २३ जून) दुपारच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी अपघातात लिंबोनी (ता. घनसावंगी) येथील शेतकरी गणेश भुजंगराव काळे (वय ३५) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेला १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.      प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे हे आपल्या मुलाला संभाजीनगर येथील शाळेत सोडण्यासाठी दुचाकी (मोटरसायकल) वरून निघाले होते. बोलेगाव शिवारात समोरून भरधाव वेगात अंबडकडून परभणीकडे जाणाऱ्या एमएच २२ एएफ ४२४८ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की मुलगा सुमारे २० फुटांवर उडून जाऊन पडला, तर गणेश काळे हे गाडीपासून बऱ्याच अंतरावर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.      दुचाकीवर मागे बसलेला १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळी आढळून आला. काही प्रवाशांनी माणुसकी दाखवत त्याला तात्काळ घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमी मु...

घनसावंगी - दोन महिन्यापूर्वी विवाहबद्ध झालेल्या विवाहितेने जीवन संपवले

Image
सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        घनसावंगी तालुक्यात एक हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. केवळ दोन महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या २२ वर्षीय विवाहितेने जीवन संपवले.        घनसावंगी तालुक्यातील श्रीपतधामणगाव येथे दिनांक २१ जून २०२५ रोजी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. केवळ दोन महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या २२ वर्षीय वैष्णवी रामेश्वर शिंदे हिने आपल्या सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार वैष्णवी चांदर (वय २२) हिचे लग्न ढाकेफळ (ता. घनसावंगी) येथील सर्जेराव चांदर यांच्या कन्येचा विवाह दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी रामेश्वर गुलाबराव शिंदे (रा. श्रीपतधामणगाव) याच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडले होते. याआधी साखरपुडा ...

कारचा भीषण अपघात अंबडचा तरुण ठार

Image
  भीषण अपघात:२१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      कारचा व कंटेनर चा भीषण अपघात झाला असून कार कंटेनरला धडकून अंबड येथील तरुणाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला. यात कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.      छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर करमाड परिसरातील सटाणा शिवारात सोमवारी (२३ जून) तीनच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. वळण घेणाऱ्या कंटेनरला भरधाव वेगाने आलेली कार जोरात धडकली. या अपघातात कारमधील एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.      अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आदित्य शिवाजी धुपे (वय २१, रा. डावरगाव, ता. अंबड, जि. जालना) असे असून, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नवनाथ धनंजय भिडे (वय ३५, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) असे आहे. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.       मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (क्र. एमएच ४३ वाय ६०६५) जालन्याकडून येत होता आणि डीएमआयसीकडे जाणाऱ्या करमाड-सटाणा शिवार...

एफआरपी थकवणाऱ्या ८ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांची कारवाई : मालमत्ता जप्त होणार

Image
  कारखान्याची यादी समोर, ५७ कोटींच्या थकीत रकमेची वसुली सुरू वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      राज्यातील शेतकऱ्यांना २०२४-२०२५ गाळप हंगामातील एफआरपी रक्कम वेळेवर न दिल्यामुळे राज्यातील ८ साखर कारखान्यांवर कठोर प्रशासनिक कारवाई करण्यात आली आहे. साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्यांची मालमत्ता जप्त करून थकीत रक्कम वसूल करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत अशी माहिती मिळाली. ५७ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एकूण ₹५७ कोटी ३२ लाखांची रक्कम थकलेली आहे. साखर आयुक्तांनी सांगितले की ही रक्कम १५% व्याजासह वसूल केली जाणार आहे. यापुढे एफआरपी थकवणाऱ्या कोणत्याही कारखान्यावर तात्काळ व सक्त कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. कारवाई झालेल्या कारखान्यांची यादी व थकीत रक्कम 1. केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगर (अहमदनगर) 👉 ₹25 कोटी 76 लाख 2. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, इंदापूर (पुणे) 👉 ₹8 कोटी 58 लाख 54 हजार 3. भैरवनाथ शुगर वर्क्स लि., लवंगी ...

जालन्यात पुन्हा घोटाळा:शासनाला तब्बल १ कोटींचा लावला चुना

Image
  बनावट दस्तावेजांच्या आधारे शेतकरी अनुदान व पीकविमा योजनांचा गैरवापर वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालन्यात शासकीय अनुदान घोटाळा महाराष्ट्रात गाजत असताना आता पुन्हा एक घोटाळा उघडकीस आला असून यात शासनाला तब्बल १ कोटींचा चुना लावण्यात आला आहे.        भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड गावात बनावट सातबारा आणि खोटे पीक पेरा दाखवत शासनाच्या अनुदान व पीकविमा योजनांमध्ये तब्बल १ कोटी २ लाख ३९ हजार रुपयांचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून कृषी व पणन विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.       या प्रकरणात आरोपींनी खोटे सातबारा तयार करून त्यावर २०९३ क्विंटल जास्तीची सोयाबीन पीक पेरा नोंदवली, त्याआधारे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान व पीकविमा मिळवला आणि त्याचाच वापर करून बनावट उत्पादन विक्रीचे दस्तावेज सादर केले. या बनावट नोंदींच्या आधारे सोयाबीनची विक्री दाखवून राज्य शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आली.     या प्रकरणी जालना जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय...

जालना - ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात माय-लेक ठार

Image
  ट्रकने दुचाकीला उडवले वडील व लहान मुलगी जखमी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वरील जामखेड फाटा येथे आज शुक्रवारी सायंकाळी एका भीषण अपघातात माय-लेक यांचा चा मृत्यू झाला असून वडील व लहान मुलगी किरकोळ जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना बीड येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या मोटरसायकलला भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने घडली.      मोटरसायकल क्रमांक महा २१ BW १८५० वर विश्वकांत शिंदे (वय ३५) हे पत्नी शीला (वय ३१), मुलगी परी (वय ४), व लहान मुलगी (वय १) यांच्यासोबत प्रवास करत होते. दरम्यान, ट्रक क्रमांक के ऐ ५६ ४२०१ चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून मोटरसायकलला जोराची धडक दिली.     धडकेनंतर शीला शिंदे व त्यांची मुलगी परी शिंदे ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. परीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शीला शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात मोटरसायकलस्वार विश्वकांत शिंदे व त्यांची लहान मुलगी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.     ...

जालना शासकीय अनुदान घोटाळा: ३८ ग्रामसेवक आणि २० कृषी सहाय्यकांवर कारवाईचा बडगा

Image
  तलाठ्यांनंतर ग्रामपंचायत व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तयारी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील शासकीय अनुदान वाटपात झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याची धडक चौकशी सुरू असताना, या प्रकरणात आता नव्या अडचणी निर्माण होत आहेत. आधीच तलाठी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली असताना, आता याच प्रकरणात दोषी आढळून आलेल्या ३८ ग्रामसेवक आणि २० कृषी सहाय्यकांवर देखील लवकरच निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. अंबड व घनसावंगी तालुक्यातील ग्रामसेवक सर्वाधिक रडारवर       विशेषतः अंबड व घनसावंगी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन व अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत स्तरावरील ३८ अधिकारी आणि कृषी विभागातील २० सहाय्यक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची शिफारस केली आहे. प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला     जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अ...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या