घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी तालुक्यातील श्रीपतधामणगाव येथे दिनांक २१ जून २०२५ रोजी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. केवळ दोन महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या २२ वर्षीय वैष्णवी रामेश्वर शिंदे हिने आपल्या सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार वैष्णवी चांदर (वय २२) हिचे लग्न ढाकेफळ (ता. घनसावंगी) येथील सर्जेराव चांदर यांच्या कन्येचा विवाह दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी रामेश्वर गुलाबराव शिंदे (रा. श्रीपतधामणगाव) याच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडले होते. याआधी साखरपुडा २७ डिसेंबर २०२४ रोजी ढाकेफळ येथे पार पडला होता. त्यावेळी लग्नात ७ तोळे सोनं आणि ५ लाख रुपये देण्याची मागणी सासरच्या मंडळींनी केली होती. सर्जेराव चांदर यांनी साखरपुड्याच्या वेळी १ लाख रुपये रोख स्वरूपात दिले होते आणि नंतर लग्नातही त्यांच्या क्षमतेनुसार सगळी तयारी केली होती.
विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस सासरी चांगले गेले, परंतु काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी वैष्णवीला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. तिची सासू सुमनबाई, पती रामेश्वर आणि दीर दौलत हे तिला सतत पैशांसाठी त्रास देत होते. रामेश्वर याचे दारूचे व्यसन होते आणि तो वैष्णवीवर कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी माहेराहून आणखी ५ लाख रुपये आणण्याचा दबाव टाकू लागला.
दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी वैष्णवी हिने स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या वडिलांना फोन करून या त्रासाबाबत माहिती दिली. तिच्यावर पुन्हा एकदा ५ लाख रुपयांच्या मागणीसाठी दबाव टाकला जात होता. वडिलांनी काही दिवस थांबण्याची विनंती केली. त्यानंतर तिने तिच्या चुलत भावालाही फोन करून या बाबतीत सांगितले होते.
दुर्दैवाने, त्याच दिवशी दुपारी ३ वाजता संतोष शिंदे या ग्रामस्थाने तिच्या आजोबांना फोन करून वैष्णवीची तब्येत बिघडल्याची माहिती दिली. जेव्हा कुटुंबीय श्रीपतधामणगाव येथे पोहोचले, तेव्हा वैष्णवीने घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यावेळी घरातील कोणतीही सासरची व्यक्ती घटनास्थळी उपस्थित नव्हती.
वैष्णवीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आणि तिच्यावरच अंत्यसंस्कार त्याच दिवशी सासरी करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण ढाकेफळ व श्रीपतधामणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घनसावंगी पोलीस ठाण्यात पती रामेश्वर शिंदे, सासू सुमनबाई शिंदे आणि दीर दौलत शिंदे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ४९८-अ, ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात करत आहेत.
He fakt vaishvi sobtch ka ghadaty
ReplyDelete