पालकांनो सावधान! खासगी शाळेच्या संचालकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

पालक संतप्त, शाळेबाहेर आक्रमक आंदोलन वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण एका नामांकित खासगी शाळेच्या संचालकाचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाच, संतप्त पालकांनी शाळेबाहेर आक्रमक आंदोलन छेडले. हा प्रकार कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात घडल्याची माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळेबाहेर मोठ्या प्रमाणावर पालक जमा झाले असून त्यांनी संचालकाच्या तात्काळ निलंबनाची आणि या कृत्याबाबत कठोर कायदेशीर कारवाईची जोरदार मागणी केली आहे. या प्रकरणाची दखल घेत शिवसेना (ठाकरे गट) कल्याण विभागाच्या पदाधिकारी आशा रसाळ यांनी तात्काळ शाळेच्या ठिकाणी भेट देऊन पालकांशी संवाद साधला. त्यांनी पालकांच्या भावना जाणून घेत प्रशासनाकडे संबंधित संचालकावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान, पालकांनी कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठून संचालकाविरोधात अधिकृत तक्रार दाखल केल...