अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे २ एप्रिल रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. संतोष भगवान खरात यांच्या पत्नीने आपल्या दोन चिमुकल्यांसह वारसाच्या गट नंबर १३० मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    विवाहिता सविता संतोष खरात (वय २५), मुलगा भावेश संतोष खरात (वय ५) आणि आबा संतोष खरात (वय ३) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, सविता खरात यांनी प्रथम आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत टाकले आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतली. अशी माहिती मिळतेय.

    ही दुर्दैवी घटना गावाशेजारील मुसा भद्रायानी नदीवरील तलावाजवळ घडली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली, तेव्हा ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच तिर्थपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि साजिद अहेमद, पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, तसेच पोलीस कर्मचारी शिंदे, माळी, पवार, जाधव आणि ग्रहरक्षक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

      या घटनेमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाली नसली तरी प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. विशेष म्हणजे मृत विवाहिता सविता खरात या संतोष खरात यांची दुसरी पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आत्महत्येमागे कोणते व्यक्तिगत किंवा कौटुंबिक कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

    रात्री उशिरा पर्यंत गावात लाईट नसल्यामुळे त्या विहिरीतील पाणी काढण्यासाठी जनरेटर ची व्यवस्था करून विहिरीबहेर पाणी काढण्यात येत होते यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ स्तब्ध झाले आहेत. या घटनेमागील नेमके कारण काय आहे, हे पोलीस तपासाअंती स्पष्ट होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत विहीरीतील पाणी काढणे सुरू होते.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!