अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!




वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 


जालना शहरात धक्कादायक घटना हाती येत असून एका प्रसिद्ध कापड व्यापारी यांनी स्वतःवर गोळी झाडल्याची घटना आज घडलीय. 

    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी आनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिलीय. या व्यापाऱ्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर ला हलवले आहे.

    जालना शहरातील उद्योजक व व्यापारी अलकेश मधुसूदन बगडीया (वय ५६) यांनी स्वतःवर गोळी झाडलीय यामध्ये गोळी त्यांच्या डोक्याचा चाटून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.व्यापारी अलकेश बगडीया यांनी कोणत्या कारणावरून स्वतःवर गोळी झाडून घेतली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

  घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी आनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिलीय.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या