नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!
नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री यांचा कार्यक्रम उधळला..!
नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांचा जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील दि २३ सप्टेंबर सोमवार रोजीचा कार्यक्रम उधळून लावण्यात आलाय. दरम्यान या घटनेमुळे तीर्थपुरी परिसरासह तालुका भरामध्ये एकच खळबळ उडाली.
घनसावंगी तालक्यातील मौजे तीर्थपुरी तालुका घनसावंगी येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम करणे साठी २०.२७ कोटी रुपयाचे उपजील्हा रूग्णायाचा आज २३ सप्टेंबर सोमवार रोजी भूमीपूजन सोहळा माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते आयोजीत केला होता. यावेळी स्थानीक नगर पंचायती मधील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांना अधिकृत कसलीच माहिती देण्यात आली नाही फक्त उपनगराध्यक्ष यांना काल आमदार राजेश टोपे यांच्या पीए नी फोन करून उद्या कार्यक्रम आहे असे सांगितले. यामुळे तीर्थपुरी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष व काही नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी पसरल्याचे दिसून आलेय.
यासाठी त्या ठिकाणी मंडप, खुर्च्या, फलक ही लावण्यात आला होता परंतु आज सकाळच्या सुमारास नुसते नारळे फोडून भूमीपूजन व स्टंटबाजी नको अधिकृत भूमिपूजन करून लगेच काम सुरू करा असे म्हणत काही जणांनी मंडप वाल्यांना आपले साहित्य काढून घ्यायला सांगितले नसता आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. यावरून मंडप वाल्यांनी काहीना फोन करून या कार्यक्रमावरून वाद होण्याची शक्यता आहे असे सांगून टाकलेला मंडप सोडून घेत, लावलेला बोर्ड, खुर्च्या काढून घेतल्या.
याबाबत तीर्थपुरी नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष शैलेंद्र पवार यांच्याशी विचारणा केली असता आमचा विकास कामात विरोध नाही मात्र आम्ही नगरपंचायत चे पदाधिकारी असताना या कार्यक्रमाबाबत शासनाकडून व कुणाकडूनच आम्हाला व नगर सेवकांना अधिकृत पत्र व कसलीच माहिती देण्यात आली नाही. मला काल आमदार राजेश टोपे यांच्या पीए यांनी फोनवरून उद्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे असे सांगितले याबाबत कुठलीच लेखी माहिती किंवा निमंत्रण देण्यात आलेले नाही यामुळे आमचा विकास कामाला विरोध नाही परंतु तुम्ही नुसते नारळ फोडून गुपचूप नुसते भूमीपुजन करण्यापेक्षा अधिकृतपणे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करायला पाहिजे असे उपनगराध्यक्ष शैलेंद्र पवार यांनी सांगितले.
Comments
Post a Comment