घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना - पोलीस पाटील भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ !

अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांची माहिती 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी जालना, अंबड, भोकरदन व परतूर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पोलीस पाटील भरती-२०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.

     मुळात अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील सध्या सुरू असलेल्या पूरपरिस्थिती व पर्जन्यमानाचा विचार करून प्रशासनाने अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलत २ ऑक्टोबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.

     अर्जदारांनी आपले अर्ज ऑनलाईन माध्यमातून सादर करणे आवश्यक आहे. अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सर्व परीक्षार्थ्यांना अर्ज करण्याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.

    अर्जदारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे, अन्यथा अर्ज मान्य होणार नाही.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या