घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
अंबड, घनसावंगी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, राजनी, विरेगाव यांसह तालुक्यातील विविध ठिकाणी आज सकाळीच धनगर समाजाच्या बांधवांनी संतप्त घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून वाहतूक ठप्प केली. तीर्थपुरी येथील अंबड–तीर्थपुरी मार्गावरील डाव्या कालव्याच्या पुलावर आंदोलन केले. यावेळी तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सपोनी वैशाली पवार यांना निवेदन सादर केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेशाची अंमलबजावणी करण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सरकार फक्त आश्वासने देत आहे, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे, असा रोष आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. उपोषण करणारे दिपक बोऱ्हाडे गेल्या पंधरा दिवसांपासून अन्नत्याग करून बसले असून त्यांच्या प्रकृतीत सतत घसरण होत असल्याचा मुद्दा आंदोलनादरम्यान तीव्रतेने मांडण्यात आला.
आमच्या तरुणांचे प्राण धोक्यात आहेत, तरीही शासन कानाडोळा का करत आहे? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. धनगर समाजाची एसटी प्रवर्गातील अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा हा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
Comments
Post a Comment