घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांसाठी सभापती पदांसाठी आरक्षण सोडत दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी कळविल्यानुसार, शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण (महिला) या गटांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नामांकित महिलांसह) राखीव ठेवावयाच्या सभापती पदांची संख्या निश्चित केली असून ती पुढीलप्रमाणे आहे:

अनुसूचित जाती : १
अनुसूचित जाती (महिला) : १
अनुसूचित जमाती : १
अनुसूचित जमाती (महिला) : १
नागरिकांचा मागास प्रवर्ग : २
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : १
सर्वसाधारण : १
सर्वसाधारण (महिला) : १

    एकूण आठ पंचायत समित्यांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात येत असून, त्या दिवशी सर्वसामान्य नागरिक व इच्छुकांनी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे हजर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

   ही सोडत जिल्हाधिकारी जालना यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली असून उपजिल्हाधिकारी (सामान्य) नम्रता चाटे यांच्या स्वाक्षरीने याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या