घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील शिंदेवडगाव शिवारात दिनांक २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास विकास जंडे यांच्या शेतातील आखाड्यावर तो उपस्थित होता. यावेळी आरोपी महेश येवले (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शिंदेवडगाव) याने जुन्या भांडणाच्या कारणावरून रागाच्या भरात ऋषीकेश याच्या दिशेने गावठी कट्ट्याने गोळी फायर केली.
गोळी ऋषीकेशच्या तोंडावर व नाकावर लागल्याने तो जखमी झाला. या हल्ल्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. हा प्रकार घडताच परिसरात एकच खळबळ उडाली.
सदर घटनेबाबत दिनांक २६ जून रोजी रात्री घनसावंगी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 318/2025, कलम 109 भा.दं.वि. सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पवार हे पुढील तपास करत आहेत.
Comments
Post a Comment