घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

पोलीस खाते हादरलं ! कार अंगावर घालून PSI ची निघृण हत्या

आधी कारने उडवलं, मग धारदार शस्त्राने सपासप वार: तीन जण अटक..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     अमरावती शहरात एक खळबळजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वलगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक (PSI) अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची अतिशय निघृण हत्या करण्यात आली. ही घटना अमरावतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल कलाम हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका फोर व्हिलरने उडवलं. अपघात झाल्याने ते रस्त्यावर कोसळले. त्याच क्षणी सुमारे पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. पोटावर आणि छातीवर एकामागोमाग एक वार करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

    जखमी अवस्थेत कलाम यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण अमरावती शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

    या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करत फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन आणि आवेज खान अयुब खान या तिघांना अटक केली आहे. मात्र, या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून या हत्येचा सर्व अंगाने तपास सुरू आहे.

    या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न समोर आला आहे – जर एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या रस्त्यात उघड्या डोळ्यांनी होऊ शकते, तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? शहरात सुरक्षेचं काय? या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

    सध्या अमरावती पोलीस या हत्येच्या सर्व शक्य कोनांमधून चौकशी करत असून हल्लेखोरांच्या पार्श्वभूमीचा तपासही सुरू आहे. पोलीस विभागाच्या प्रतिष्ठेवर घाव घालणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अमरावतीकडे वळले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या