अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार- प्रहारचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंढे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची दिली धमकी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

       जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जांब समर्थ कोठाळा (ता. घनसावंगी) येथील ह.मु. सुरंगे नगर अंबड येथे राहणाऱ्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहन शेषराव मुंढे यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमाचे नाटक करून शरीरसुखाचा गैरफायदा

     फिर्यादी महिला आपल्या आई-वडील व मुलासह अंबड येथील सुरंगे नगरमध्ये एका खोलीत किरायाने राहते. आरोपी मोहन मुंढे व पीडित महिला यांची पूर्वीपासून ओळख होती. त्यातूनच दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. एक दिवस आरोपीने महिलेच्या भावना खेळवत तिच्यावर प्रेम असल्याचे भासवले व लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सुरुवातीला दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि आरोपीने वारंवार तिच्यावर बलात्कार केला.

लग्नास नकार देत धमकी दिली

     काही काळानंतर महिलेने मोहन मुंढे यांच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला असता, त्याने स्पष्टपणे नकार दिला. एवढ्यावरच न थांबता, त्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिच्या मुलासह आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू

   या प्रकरणी पीडित महिलेने अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मोहन शेषराव मुंढे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६९, ३५२, ३५१ (२) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

जनतेत संतापाची लाट

    या प्रकारामुळे अंबड शहरात आणि जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, एका सामाजिक व राजकीय पदावर असलेल्या व्यक्तीच्या अशा वर्तनामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments

Popular posts from this blog