घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

मराठा राज्यव्यापी बैठक: आंतरवाली सराटीतून मुंबई आंदोलनाची हाक

लाखोंच्या उपस्थितीत ऐतिहासिक बैठक; मनोज जरांगे पाटलांचा एल्गार


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     २९ जून २०२५ रोजी आंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा समाजाच्या नियोजनासाठी एक भव्य व ऐतिहासिक राज्यव्यापी बैठक पार पडली. लाखोंच्या संख्येने उपस्थित मराठा बांधवांनी ही सभा मराठा एकजुटीचा शक्तिप्रदर्शन ठरवली. या बैठकीतून समाजाने आगामी मुंबई आंदोलनासाठी रणनिती ठरवली असून, आंदोलनाच्या नेतृत्वाची धुरा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा समर्थपणे सांभाळली.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व संदेश

   मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणातून मराठा समाजाच्या लढ्याची दिशा स्पष्ट केली:

"इतके दिवस आंदोलन चालू असतानाही मराठा समाज मागे हटलेला नाही. ही चिकाटीच आपल्या विजयाचे कारण ठरणार आहे," असे ते म्हणाले.

"व्हाट्सॲप, फेसबुकवर पाठिंबा देण्याची वेळ संपली आहे. आता थेट मैदानात उतरण्याची वेळ आली आहे."

"२७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आंतरवाली सराटीहून निघून, २९ ऑगस्ट रोजी कोट्यवधी मराठ्यांसह मुंबईत दाखल होणार आहोत."

"राजकारणी निवडणूक जिंकण्यासाठी झटतात, पण समाजासाठी कोणी उभं राहत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल."

"मुंबईत शांततेने जाणार आहोत. पण जर एका मराठा बांधवाला जरी काठी लागली, तर संपूर्ण महाराष्ट्र बंद पडेल, हे फडणवीसांनी लक्षात ठेवावे."

"पावसाची शक्यता लक्षात घेता सर्वांनी तयारीनिशी मुंबईकडे निघा. गावागावातून वर्गणी गोळा करून पेट्रोल, छत्र्या, अन्नाची व्यवस्था करा."

 आमदारांशी थेट संपर्क

     मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांना फोन करून मुंबई आंदोलनाबाबत माहिती दिली व सरकारकडे मागण्यांची पूर्तता करण्याचा आग्रह केला. "पहिल्यांदाच मी देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन केला असून, २८ ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. त्या नंतर मी आंतरवली सोडली, की मागे वळून पाहणार नाही," असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

 प्रमुख मागण्या

1. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर तात्काळ काढावा.

2. न्या. शिंदे समितीला १ वर्षाची मुदतवाढ द्यावी.

3. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकरी व आर्थिक मदत द्यावी.

4. कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी प्रक्रियेत सुलभता आणावी.

5. हैद्राबाद, मुंबई, सातारा, औंध गॅझेट लागू करावेत.

6. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.

7. मराठा आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत.

8. स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी.

9. कोपर्डी पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा.

संभाव्य आंदोलन मार्ग

 अंतरवली सराटी – शहागड – पैठण – अहिल्यानगर – आळेफाटा – शिवनेरी – कल्याण मार्गे मुंबई

(मार्गात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो)

ऐतिहासिक निर्णयाची सुरुवात

     ही बैठक केवळ नियोजन नव्हे, तर संपूर्ण मराठा समाजाच्या मनातील रोष, आत्मविश्वास आणि निर्णायकतेचे प्रतिबिंब ठरली. उपस्थित लाखो मराठा बांधवांच्या घोषणा आणि मनोज जरांगे पाटलांच्या भाषणातून एकच संदेश घुमत होता.

"मुंबईच्या रणभूमीत उतरायचं, मैदान गाजवायचं आणि विजय मिळवायचाच!" असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या