अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी -चाकरवाडीला देवदर्शनासाठी पतीसोबत जात असताना अपघात पत्नीचे दुर्दैवी निधन



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

       घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथील मीना भारत राऊत (वय ४२) यांचे २४ जून रोजी दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्या आपल्या पती भारत राऊत यांच्यासोबत चाकरवाडी येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला.

        प्राप्त माहितीनुसार, दोघे पती पत्नी दुचाकीवरून रस्त्यात जात असताना अचानक तोल जाऊन मीना राऊत खाली पडल्या व गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर तातडीने त्यांना बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

     त्यांच्या जाण्याने राऊत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. २५ जून रोजी मुद्रेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या