घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
प्रभारी उपविभागीय अधिकारी चव्हाण यांना काही ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंबड उपविभागीय कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी तत्काळ घनसावंगी प्रभारी तहसीलदार संतोष इथापे व त्यांच्या सहकाऱ्यांसह पथक तयार करून मौजे मंगरुळ व मुद्रेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्र व शेतांतून अवैधरीत्या काढण्यात आलेल्या वाळूची पाहणी केली.
पाहणीदरम्यान शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू साठवलेली असल्याचे निदर्शनास आले. हे सर्व वाळू उत्खनन नदीपात्रातून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, संबंधित वाळू माफियांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत.
विजय चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संबंधित वाळू माफियांविरोधात वाळू उपसा धोरण कायदा २०२५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याशिवाय, ज्यांच्या शेतात अवैध वाळू साठवणूक आढळून आली, त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या पुढील टप्प्यातील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment