घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

तीर्थपुरी पोलिसांना चकमा देत DYSP कार्यालयाची कारवाई - ६.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

भद्रायणी नदीत अवैध वाळू उपसा व वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडला; तीर्थपुरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

       अंबड तालुक्यातील रुई येथील भद्रायणी नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर अखेर पोलिसांनी कारवाईची झडप टाकली आहे. तीर्थपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात पोलिस अपयशी ठरत असतानाच, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अंबड यांच्या पथकाने २४ जून रोजी सकाळच्या सुमारास रुई येथील नदीपात्रावर छापा टाकत ट्रॅक्टरसह वाळू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना रंगेहात पकडले. या कारवाईत अंदाजे ₹६,४३,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे तीर्थपुरीचे सपोनि साजीद अहमद यांच्या दुर्लक्षामुळे बोकाळलेल्या अवैध धंदे, चोरीच्या घटना, अवैध वाळू उपसा व वाहतूक, वाहतुकीची कोंडी यात अनेकवेळा झोपेचे सोंग घेत असलेल्या कारभारबद्दल मला पहा अन् पानफुल वाहा असेच झाल्याचे दिसून येते.

      कारवाईदरम्यान महिंद्रा कंपनीचा अर्जुन ५५५ मॉडेलचा ट्रॅक्टर (विना क्रमांक) आणि वाळूने भरलेली ट्रॉली (विना क्रमांक) जप्त करण्यात आली. संबंधित वाहनांमध्ये सुमारे एक ब्रास वाळू भरलेली होती. पोलिसांनी इंद्रजीत शिवाजी पिसुळे (वय २१) आणि दिलीप धुराजी राजगुरू (दोघेही रा. रुई, ता. अंबड) यांना अटक करून यांच्या विरुद्ध तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      प्राथमिक चौकशीत आरोपींनी कोणताही शासकीय परवाना न घेता संगनमताने अवैध वाळू उपसा व वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही आरोपींना अवैध वाळू उपसताना ट्रॅक्टर व ट्रॉलीसह रंगेहात पकडण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ट्रॅक्टरची अंदाजे किंमत ₹६ लाख व ट्रॉलीची किंमत ₹४३ हजार इतकी आहे. दोन्हीही वाहनांसह वाळू जप्त करण्यात आली आहे.

     या प्रकरणी पोलीस नाईक नवनाथ ताराचंद राऊत (उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अंबड) यांनी फिर्याद दिली असून, सपोनि यांच्या आदेशानुसार बिट अंमलदार भगवान शिंदे पुढील तपास करीत आहेत.

    दरम्यान, भद्रायणी नदीपात्रात अनेक महिन्यांपासून बिनधास्तपणे आणि सर्रास अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. मात्र, तीर्थपुरी पोलिसांकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते. त्यामुळे या प्रकरणात तीर्थपुरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या