अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

अंगावर ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा मृत्यू , एक गंभीर जखमी

 रोटावेटर घसरल्याने ट्रॅक्टरचा तोल सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

        अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव परिसरात आज (दि. २४ जून) दुपारी सुमारास ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर एक १४ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव अण्णासाहेब नामदेव गव्हाणे (वय ३८) असून, जखमी मुलाचे नाव गोपाल विष्णु सिंग पवार (वय १४) असे आहे.

      ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घुंगर्डे हादगाव–तिर्थपुरी रोडवरील चारी क्रमांक २२ येथे घडली. ट्रॅक्टरवरील रोटावेटर (शेतकामासाठी वापरण्यात येणारे यंत्र) घसरल्याने ट्रॅक्टरचा तोल सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला. यामध्ये अण्णासाहेब गव्हाणे हे ट्रॅक्टरखाली दबून जागीच ठार झाले, तर गोपाल पवार गंभीर जखमी झाला.

      घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली आणि जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. अण्णासाहेब गव्हाणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला असून, जखमी गोपाल पवार याला तात्काळ अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

     या अपघातामुळे घुंगर्डे हादगाव परिसरात शोककळा पसरली असून, अण्णासाहेब गव्हाणे यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या