घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलैदरम्यान मुंबईत

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा ३० जूनपासून सुरू होणार असून, १८ जुलैपर्यंत ते चालणार आहे. अधिवेशनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील विविध वरिष्ठ मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते.

     या बैठकीस विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

     या अधिवेशनात राज्यातील महत्त्वाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा, तसेच विविध विधेयकांच्या मंजुरीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल, तर सरकारकडून आपल्या कामकाजाचा आढावा मांडला जाईल.

 या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन नेहमीप्रमाणेच राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, जनतेचे लक्ष या अधिवेशनात होणाऱ्या घडामोडांकडे लागले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या