घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

छत्रपती संभाजीनगर हादरले! महिला कीर्तनकार यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात स्थित सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात राहणाऱ्या लोकप्रिय महिला कीर्तनकार संगीताताई अण्णासाहेब पवार (वय अंदाजे ४५) यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. आश्रमाजवळील एका शेडमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समजताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, तपासासाठी फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

   संगीताताईंना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या धमक्यांबाबत त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीताताईंना आतापर्यंत तीन वेळा अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र, याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.

    मिळालेल्या माहितीनुसार, संगीताताई पवार या धार्मिक आणि कीर्तन सेवा क्षेत्रात कार्यरत होत्या. त्यांच्या किर्तनात समाजप्रबोधनाची दिशा असायची. त्यामुळे समाजातील काही अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रवृत्तींवर त्यांनी वेळोवेळी टीका केली होती, त्यामुळे त्यांना विरोध होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरु आहे.

   पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व शक्य त्या दिशांनी तपास सुरु आहे. हत्येचे नेमके कारण, आणि मारेकऱ्यांमागील सूत्रे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

    या घटनेनंतर वैजापूरसह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलीसांनी तत्काळ आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून केली जात आहे. संगीताताई पवार यांच्या हत्येमुळे धार्मिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण राज्याचे लक्ष आता या प्रकरणाच्या तपासाकडे लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या