अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

शेतातील डबक्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

अवघ्या सात व पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू:गावावर शोककळा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात खेळताना दोन निरागस बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मोढा बु. गावात घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले आहेत.

      मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या बालकांची नावे हर्षदा गणेश कांबळे (वय ७) आणि रुद्र गणेश कांबळे (वय ५) अशी असून, हे दोघेही ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील होते. रविवार दुपारी घराजवळील शेतशिवारात ते खेळत असताना एका मोठ्या डबक्यात ते बुडाले. काही वेळातच त्यांचा शोध घेणाऱ्या नातेवाइकांना ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    या दुःखद घटनेने कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी कुटुंबीयांना धीर दिला.

     दरम्यान, मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतांमध्ये आणि आजूबाजूच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी लहान मुले सहज खेळायला जातात आणि दुर्घटना घडण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर प्रशासन व पालकांनी विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

   ही घटना एक गंभीर इशारा असून, अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनीच काळजी व दक्षता घेणे गरजेचे आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या