घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर, पण अनिश्चिततेचे सावट कायम

अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर; लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा वाढली


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली आहे. दहावीचा निकाल लागून दीड महिन्याहून अधिक काळ उलटल्यानंतरही अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी (Regular Round-1) अद्यापही जाहीर झालेली नाही. परिणामी, राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक या यादीच्या प्रतीक्षेत असून त्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी ११ वाजता ही यादी जाहीर होणार असल्याची अधिकृत माहिती दिली गेली होती. मात्र आता ही यादी पुढील चार ते पाच दिवस लांबणीवर टाकण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही यादी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तरी प्रसिद्ध होते का, याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. अद्याप शिक्षण संचालनालयाकडून कोणतेही स्पष्ट किंवा लेखी निवेदन प्राप्त झालेले नाही.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

    दरम्यान, शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी नियमित फेरी-१ व कोटा प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे टप्पे पार पडणार आहेत:

 नियमित फेरी - १ (CAP Round 1)

Allotment जाहीर करण्याची तारीख: ३० जून २०२५

विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशाची माहिती मिळेल.

   SMS द्वारेही प्रवेशाबाबत सूचना दिली जाईल. कट ऑफ यादी कनिष्ठ महाविद्यालयांद्वारे संबंधित यादी दाखवली जाईल. विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संबंधित महाविद्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करतील, फेरी संपल्यानंतर पोर्टलवर शिल्लक जागांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

 कोटानिहाय प्रवेश प्रक्रिया (०१ जुलै ते ०७ जुलै २०२५)

   इन-हाऊस, व्यवस्थापन, अल्पसंख्यांक कोटा यामधील अर्जांची यादी संबंधित विद्यालयाच्या लॉगिनमध्ये प्रदर्शित होईल. विद्यालयांनी गुणवत्ता यादी/निवड यादी जाहीर करून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संपर्क करावा. पात्र विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश निश्चित करावा. विद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम करावेत

 विद्यार्थ्यांमध्ये वाढती अस्वस्थता

     सतत होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन फॉर्म भरले आहेत, मात्र यादी जाहीर न झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेस विलंब होत आहे. परिणामी नवीन शैक्षणिक वर्षावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून ही मागणी जोर धरत आहे की, राज्य शिक्षण विभागाने तातडीने स्पष्ट भूमिका घेऊन यादीबाबत अचूक वेळ आणि तारखेची अधिकृत घोषणा करावी.

   सर्व विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांनी अधिकृत वेळापत्रकानुसारच प्रक्रिया पार पाडावी. कोणतीही विलंबित कृती शिक्षण संचालनालय विचारात घेणार नाही. असे डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांनी कळवले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या