अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

बीड जिल्ह्यात काळीमा फासणारी घटना: कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार !

 उमाकिरण व ओम क्लासेसचे विजय पवार आणि प्रशांत खटोकर यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राची विश्वासार्हता डागळवणारी आणि समाजाला हादरवून सोडणारी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उमाकिरण आणि ओम कोचिंग क्लासेसचे शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खटोकर या दोघांवर अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्यावर POCSO (Protection of Children from Sexual Offences) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     मुलींच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कठोर कायद्याखाली या दोघांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे बीडमधील पालक आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड संताप व अस्वस्थता पसरली आहे. "शिक्षक" ही पदवी श्रद्धेची असते, पण काही विकृत प्रवृत्तीचे लोक या पदाचा गैरवापर करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची बदनामी करत आहेत, हे दुर्दैव आहे.

    या घटनेचा समाजातील विविध स्तरातून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. अनेकांनी यासाठी सोशल मिडियावर तसेच प्रत्यक्षातही निषेध आंदोलन सुरू केले आहे. उमाकिरण शिकवणीमधील घडलेली ही घटना ही केवळ एका विद्यार्थिनीवर अन्याय नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर आघात करणारी आहे.

     पोलिस प्रशासनाकडून प्राथमिक तपास सुरू असून, संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथके स्थापन करण्यात आले आहेत. या प्रकरणामागे आणखी कोणी आका किंवा समर्थन करणारी मंडळी आहेत का, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण फक्त गुन्हेगारालाच शिक्षा देऊन चालणार नाही, तर अशा घृणास्पद प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांनाही उघड करून कठोर कारवाई केली पाहिजे.

     मुलींच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी समाजाने एकजूट होऊन अशा प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवणे हे काळाची गरज बनली आहे. समाज, पोलीस आणि न्यायव्यवस्थेने एकत्र येऊन या प्रकरणात कठोर पावले उचलावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

   "गुन्हेगाराला शिक्षा हवीच, पण त्यामागच्या आका-सम्राटांनाही बेपर्दा करणे आवश्यक आहे. भविष्यात अशा नालायक लोकांना कोणीही पाठीशी घातले नाही पाहिजे अशा संत्रप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


Comments

Popular posts from this blog