अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी- युवकाचे अपहरण; गावठी कट्टा व कु-हाडीचा धाक दाखवत केले अपहरण

 जुन्या वादाच्या कारणावरून केले अपहरण 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बाजार समितीसमोर काल रात्री १० वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादाच्या कारणावरून एका युवकाचे चार जणांच्या टोळीने गावठी कट्टा आणि कु-हाडीचा धाक दाखवत अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

     फिर्यादी सुभाष लळितराव आर्दड ( रा. राजाटाकळी, ता. घनसावंगी) यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.यातील संशयित आरोपी हरी तौर याने गावठी कट्ट्याचा धाक दाखवला, तर खन्ना आर्दड याने कु-हाडीने धमकावले. त्यानंतर जबरदस्तीने त्याला गाडीत बसवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अज्ञात ठिकाणी घेऊन गेले.असे तक्रारीत म्हटले आहे.

    घटनेनंतर लगेचच पोलीस निरीक्षक राठोड, सपोनि खरात, पोउपनि पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध सुरू आहे. अद्याप कोणत्याही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या