घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मोटरसायकल क्रमांक महा २१ BW १८५० वर विश्वकांत शिंदे (वय ३५) हे पत्नी शीला (वय ३१), मुलगी परी (वय ४), व लहान मुलगी (वय १) यांच्यासोबत प्रवास करत होते. दरम्यान, ट्रक क्रमांक के ऐ ५६ ४२०१ चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून मोटरसायकलला जोराची धडक दिली.
धडकेनंतर शीला शिंदे व त्यांची मुलगी परी शिंदे ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. परीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शीला शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात मोटरसायकलस्वार विश्वकांत शिंदे व त्यांची लहान मुलगी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी अंबड पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी तात्काळ मदतकार्य राबवत जखमी व मृतांना रुग्ण वाहिकेने घाटी रुग्णालयात रवाना केले व अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघातग्रस्त कुटुंबातील दोन निष्पाप जीवांचा मृत्यू झाल्यामुळे शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments
Post a Comment