घनसावंगी तालुक्यात अत्याचाराच्या दोन घटना !

घनसावंगी तालुक्यात अत्याचाराच्या दोन घटना ! जिवे ठार मारण्याची धमकी देत केला लैंगिक अत्याचार एक दुर्दैवी व काळीमा फासणारी घटना समोर येत आहे घनसावंगी तालुक्यात एका मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देत एका ३० वर्षीय तरुणाने मुलींवर लैंगिक अत्याचार केलाय याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याआधी ही घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथेही आत्याचाराची घटना घडली होती. मागील पाच महिन्यांपासून घनसावंगी तालुक्यातील विठ्ठलनगर शिवारात संशयित आरोपी अनिल नामदेव शिंदे याने शाळेत जात असताना एका मुलीला वारंवार अडवून तिला जबरदस्तीने अत्याचारासाठी दबाव आणत होता. आरोपीने काही दिवसापूर्वी सदरील मुलीला मोबाईल व पैसे देऊन तिला उसाच्या शेतात नेले व तिच्यासोबत जबरदस्तीने आत्याचार केला. त्यानंतर तिला धमकी दिली की, जर तू कोणाला काही सांगितले, तर तुला जिवे ठार मारले जाईल असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे तिर्थपुरी येथे आरोपी विरुद्ध 64(2) (M), 351 (2) बी एन एस सह कलम 4, 6 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, 2012 नुसार गुन्...