धक्कादायकः भावी पतीसमोरच नराधमाचा तरुणीवर अत्याचार!

 धक्कादायकः जालन्यात 

भावी पतीसमोरच नराधमाचा

 तरुणीवर अत्याचार !


 नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..


  जालन्यात अत्यंत धक्कादायकः घटना घडली असून एका तरुणीच्या भावी पतीला ठार मारण्याची धमकी देत, एका नराधमाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केलाय.

  याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की काल बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास, जालन्यातील रेल्वे स्थानकावर भावी पतीला जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या २० वर्षीय तरुणीला तिच्या भावी पतीसह रेल्वे भुयारी पुलाखालून घराकडे जात असताना अंधारात प्रेम रवी पाचगे (र. नूतन वसाहत, जालना) या आरोपीने अचानक थांबवले. त्याने तरुणीला बाजूला बोलावले आणि तिला नाल्याकडे नेले. त्याठिकाणी तिच्या भावी पतीला ठार मारण्याची धमकी देत, त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

पोलिसांची तातडीची कारवाई:

भावी पती आणि तरुणीने आरोपीच्या तावडीतून सुटका केली आणि कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने, सहायक पोलीस निरीक्षक अमित म्हस्के, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलिस उपनिरीक्षक किशोर वनवे आणि पोलिस हवालदार नंदकिशोर ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.


आरोपीला अटकः

   पोलिसांनी रात्रीच आरोपी प्रेम पाचगे याचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 64, 351 (2) (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर वनवे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!