उपविभागीय अधिकारी यांची होडीत जाऊन वाळू तस्करीवर कारवाई
उपविभागीय अधिकारी यांची होडीत जाऊन वाळू तस्करीवर कारवाई
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकीत सिंह यांनी आज दि ३० डिसेंबर रोजी दोन हायवा, दोन ट्रॅक्टर, वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी केनी आणि अन्य साहित्य जप्त केले. विशेष म्हणजे, गोंदी येथे त्यांनी होडीत बसून कारवाई केली, ज्यामुळे या कारवाईने मोठा धक्का दिला आहे.
आज सकाळी जामखेड फाटा येथे पुलकीत सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला. सकाळी पाच वाजता हा हायवा तब्बल तीन किलोमीटर पाटलाग करून पकडण्यात आला आणि त्यानंतर तहसील कार्यालयात लावण्यात आला. पथकात मंडळ अधिकारी विजय जोगदंड, विठ्ठल गाडेकर, श्रीनिवास जाधव, चंद्रकांत खिल्लारे, ईश्वर पावसे आणि श्रीमती सुकन्या गवते सहभागी होते.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी पुलकीत सिंह यांनी अंबड तालुक्यातील गोंदी येथे होडीत बसून अधिकाऱ्यांनी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळू वाहतुकीवर कडक पावले उचलली गेली असून, वाळू तस्करांवर मोठा धक्का बसला आहे.
Comments
Post a Comment