अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

माझ्या अंगात देव येतो असे म्हणत महिलेवर अत्याचार

 माझ्या अंगात देव येतो असे
 म्हणत महिलेवर अत्याचार

महिलांनी भोळा भाव देवा मला पाव ही भूमिका सोडावी 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   महाराष्ट्र भरत दररोज विविध घटना, घडामोडी घडताहेत यात विशेष करून महिला, मुली, अल्प वयीन मुली यांच्यावर अत्याचारांच्या घटनाही दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. पुण्यात एक अत्यंत धक्कादायक व खेद जनक घटना घडलीय. माझ्या अंगात देव येतो असे म्हणत एका महाशयाने चाकूच्या धाकावर महिलेवर आत्याचार केलय. या महिलेने या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली आहे. म्हणून कही महिलांनी आपली श्रद्धा ठेवावी परंतु अंधश्रद्धा न ठेवता भोळा भाव देवा मला पाव ही भूमिका सोडावी व अशा भोंदू पासून सावध होण्याची गरज आहे.

    याआधी सुद्धा महाराष्ट्रात महिलांविरोधात असे गुन्हे घडले आहेत. कठोर कायदे बनवूनही गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी शासन व प्रशासन यांच्या कडून अनेक कठोर पावलं उचलण्यात येऊन कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र तरीही घडणाऱ्या गुन्ह्यांच प्रमाण कमी झालेलं दिसून येत नाही. 

  पुण्याच्या राजगुरुनगर भागात पाच दिवसापूर्वी दोन अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या घटनेमुळे आधीच नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. बीअर बारमध्ये काम करणाऱ्या एका नराधमाने त्याच्या घराबाहेर खेळणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार करून त्यांची निघृण हत्या केली. आरोपीला कठोरात कठोर शासन झाल पाहिजे यासाठी संतप्त नागरिकांना आंदोलन करून सदरील आरोपीचे एन्कॉटर करा आशी मागणी केली होती.

  वरील घटना ताजी असतानाच पुण्यात एका महिलेवर बलात्कार झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना घडलीय. माझ्या अंगात देव येतो असे म्हणत एका महाशयाने चक्क चाकूच्या धाकावर महिलेवर आत्यचार केलाय. महिलेने या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

प्रत्येक कार्यक्रमात महिलांची संख्या जास्त..

   दरम्यान विविध कार्यक्रमासह धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमात पुरुषापेक्षा महिलांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत असून कही महिलांना असे महाशय आपल्या जाळ्यात ओढताना दिसून येत आहेत. म्हणून अशा काही महिलांनी श्रद्धा ठेवावी परंतु अंधश्रद्धा न ठेवता भोळा भाव देवा मला पाव ही भूमिका सोडून अशा भोंदू पासून सावध होण्याची गरज आहे. तसेच सजग होण्याची गरज आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या