तीर्थपुरीत तरुणाचा मृत्यू ; नातेवाईकातून घातपाताचा संशय

 तीर्थपुरीत तरुणाचा मृत्यू ;

नातेवाईकातून घातपाताचा संशय



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे आज ३१ डिसेंबर मंगळवारी एक दुःखद घटना समोर आली आहे. मूळ गाव पीरगैबवाडी येथील राजू छबू कोळेकर (वय २८ वर्षे) यांचा मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी तीर्थपुरी ते अंबड रोडवर दुपारच्या सुमारास मृतदेह आढळला. 


  त्यांनतर तीर्थपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, पोहेको नारायण माळी यांनी तत्काळ राजूस प्राथमिक आरोग्य केंद्र तीर्थपुरी येथे हलवले असता वैदकिय अधिकारी डॉ एस डी घुले यांनी तपासून राजूस मयत घोषीत केले.


   राजुच्या बहिणी यांनी सांगितले की राजू ची पत्नी तीन महिन्यांपासून तीर्थपुरी येथील एका धाब्यावर भांडे घासण्याचे काम करत होती. तीन दिवसापूर्वी राजू पुण्याहून तीर्थपुरी ला आला होता घटनेच्या दिवशीच राजू ने दुपारी १:३० वाजता त्यांचे रुई येथील मेहुने परमेश्वर लक्ष्मण गव्हाणे यांना मोबाईलवर फोन करून तीर्थपुरी येथे बोलावले होते. ते आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

   दरम्यान राजुच्या बहिणी सिला परमेश्वर गव्हाणे व गोकुला सुदाम देशमुख यांनी त्याच्या मृत्यू वर घातापाताचा संशय वेक्तः केला असून याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत शव विच्छेदन झाले नव्हेत याप्रकरणी त्यांचे नातेवाईक उशिरा तीर्थपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. राजू याच्या पश्यात पत्नी, भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.



दरम्यान राजुचे प्रेत शव विच्छेदन साठी तीर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते त्यावेळी राजुच्या अंगावर, हातावर जखमा आढलून आल्या यामुळे त्याचा घातपात झाल्याच्या संशयाला जागा मिळाली असून या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या ? कुणी केल्या? कधी केल्या या प्रश्नाची उत्तरे मात्र समजू शकले नाही.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!