घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यात साखर कारखान्यात स्फोट, दोन जण ठार

 जालन्यात साखर कारखान्यात

 स्फोट, दोन जण ठार



जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वरफळ येथे आज एक दुर्दैवी घटना घडली. बागेश्वरी साखर कारखान्याच्या चुनाभट्टी विभागातील सल्फर टाकीचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.



या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यात दोघेही कामगार जागीच ठार झाले. घटनास्थळी तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिक प्रशासनाने घटनेची त्वरित दखल घेतली असून, तपास सुरू आहे.



घटनेची माहिती मिळताच स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी रुग्णालयात धावले आणि पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले. कारखाना व्यवस्थापनाकडून या अपघाताचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक लोकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या