घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
दोन लहान बहिणींची हत्या ! ड्रममध्ये छिन्नविछिन्न मृतदेह आढळले
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये २५ डिसेंबर रोजी एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजवली आहे. दोन लहान बहिणी खेळताना अचानक बेपत्ता झाल्या, आणि त्यांचा शोध घेतल्यावरही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. रात्री उशिरा, शहराच्या बाहेर एका इमारतीच्या बाजूला एका ड्रममध्ये त्यांचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले. अशी प्राथमिक माहिती हाती येत आहे.
सदरील माहिती परिवाराला कळल्या नंतर परिसर हादरून गेला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, प्राथमिक तपासानुसार मुलींच्या हत्या व लैंगिक अत्याचाराच्या शक्यतांचा विचार केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे, आणि हत्येचे कारण व आरोपींचा शोध घेत आहेत.
या घटनाशी संबंधित असलेली आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, कल्याणमधील आत्याचार व हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विशाल गवळीला शेगाव येथील श्रीकृपा जेन्टस पार्लर या सलूनमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने आपली ओळख लपविण्यासाठी सलूनमध्ये दाढी काढली होती, परंतु त्याचवेळी पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावरील तपास देखील सुरू आहे
या धक्कादायक घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, आणि पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनांच्या तपासाची दिशा आता वेगाने बदलत असून, या हत्यांचा मुख्य कारण शोधण्यासाठी पोलीसांची तपास प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती सुत्राकडून मिळाली
Comments
Post a Comment