घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
जालना शहरातील संजयनगर भागात एका कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकून एका महिलेसह तीन वेश्यांना रंगेहात पकडले आहे. कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली. या कारवाईत एका महिलेच्या घरात चालवला जाणारा कुंटणखाना आज २५ डिसेंबर रोजी उध्वस्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत घरातून कंडोमचा साठा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. ग्राहकांकडून वेश्याव्यवसायासाठी घेतले जाणारे पैसे या कुंटणखान्याची मालकीण स्वतःकडे ठेवत असे आणि उर्वरित रक्कम पीडित महिलांना देत असे.
ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची आर्थिक स्थिती हलाखीची असून, त्यापैकी दोन महिला पतीपासून विभक्त आहेत. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment