जालन्यात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाकडून अत्याचार
जालन्यात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाकडून अत्याचार
पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
एका अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाकडून अत्याचार करून तो पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या पोलिसांनी आज रविवारी मुसक्या आवळल्यात.
जालना येथील रेल्वेस्टेशन परिसरातील सोनलनगर येथे एका इमारत बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी परतूर तालुक्यातील एक व्यक्ती वॉचमन म्हणून काम करीत असून, त्याठिकाणी तो व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत आहे. या इमारतीमध्ये उत्तर प्रदेशातील कामगारांकडून फरशी बसविण्याचे काम सुरू आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी वॉचमनची १४ वर्षीय मुलगी इमारतीच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळू घालण्यासाठी गेली असतांना फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या फैजान खान (रा. उत्तर प्रदेश) याने तिचा हात धरून बळजबरीने खालच्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये तिच्यावर अत्याचार केला होता. मात्र, बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या कुटुंबाने याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती.
आज रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आज सदर मुलगी पुन्हा इमारतीच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळू घालण्यासाठी गेली असता, पुन्हा फैजान खान याने तिचा हात पकडून बाथरूमकडे नेण्याचा प्रयत्न केला यावेळी मुलीने प्रतिकार करून आरडाओरडा करताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. याप्रकरणी सदर मुलीच्या नातेवाईकांनी कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्याबरोबरच ॲट्रॉसिटी कायदा आणि पोस्को कायद्यानुसार वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, सहायक पोलीस निरीक्षक अमित म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. आरोपी फैजान हा उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना त्याला पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून आज रात्री उशिरा ताब्यात घेतले अशी माहिती मिळाली.
Comments
Post a Comment