घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
पुण्यातील कल्याण येथे अल्पवयीन मुलीचे अत्याचारातून हत्येचे प्रकरण घडल्यानंतर राजगुरुनगर येथेही असाच काहीसा प्रकार घडला. राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन बहिणींच्या अत्याचारानंतर झालेल्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. संशयीत आरोपी अजय दास (वय ५४), याने या मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत आरोपीला परराज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करताना अटक केली आहे.
या घटनेनंतर पुण्यातील भटक्या विमुक्त समाजाने तीव्र निदर्शने केली असून, समाजातील गोसावी समाजाने आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आंदोलकांनी आरोपीचा "हैदराबाद पॅटर्न" प्रमाणे एन्काऊंटर करून भर चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे.
भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांनी आरोप केला आहे की, सरकारने त्यांना दुर्लक्षित केले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत त्यांना संरक्षण दिले जावे आणि या घटनेतील मृत मुलींच्या पालकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी.
सरकारकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईसाठी समाजाचा दबाव वाढत आहे.
Comments
Post a Comment