घनसावंगी तालुक्यात अत्याचाराच्या दोन घटना !
घनसावंगी तालुक्यात अत्याचाराच्या दोन घटना !
जिवे ठार मारण्याची धमकी देत
केला लैंगिक अत्याचार
एक दुर्दैवी व काळीमा फासणारी घटना समोर येत आहे घनसावंगी तालुक्यात एका मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देत एका ३० वर्षीय तरुणाने मुलींवर लैंगिक अत्याचार केलाय याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याआधी ही घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथेही आत्याचाराची घटना घडली होती.
मागील पाच महिन्यांपासून घनसावंगी तालुक्यातील विठ्ठलनगर शिवारात संशयित आरोपी अनिल नामदेव शिंदे याने शाळेत जात असताना एका मुलीला वारंवार अडवून तिला जबरदस्तीने अत्याचारासाठी दबाव आणत होता.
आरोपीने काही दिवसापूर्वी सदरील मुलीला मोबाईल व पैसे देऊन तिला उसाच्या शेतात नेले व तिच्यासोबत जबरदस्तीने आत्याचार केला. त्यानंतर तिला धमकी दिली की, जर तू कोणाला काही सांगितले, तर तुला जिवे ठार मारले जाईल असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस ठाणे तिर्थपुरी येथे आरोपी विरुद्ध 64(2) (M), 351 (2) बी एन एस सह कलम 4, 6 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, 2012 नुसार गुन्हा दाखल असुन पुढील तपास अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक ए.के.ढाकणे करीत आहेत. आरोपी सद्य स्थितीत न्यायलयीन कोठडीत आहे
दिवसेंदिवस लैंगिक शोषण व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे. काही दिवसापूर्वी अंबड येथे एका मुलीने त्रासाला कंटाळून गळफास घेऊन जीवन संपवले होते तसेच काही दिवसापूर्वी घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथेही एका कोचिंग क्लासेस च्या एका संचालकाने क्लास मधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले होते.
अशा घटना घडू नयेत म्हणून पालकांनी आपली मुलगी कधी शाळेत जाते, कुटल्या क्लासेस ला जाते, शाळा व क्लासेस ला भेट देणे, तिला येता जाता रस्त्याने कुणी टवाळ खोर त्रास तर देत नाही ना याची शहानिशा करणे गरजेचे असून याबाबत आपल्या मुलीकडेही चौकशी करण्याची गरज असून याकडे आपण स्वतः जातीने लक्ष देणे गरजेचे आहे अशा प्रतिकिर्या जनतेतून वेक्त होत आहेत.
Comments
Post a Comment