घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले
शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार किंवा विनयभंगाचे प्रकार घडतानाच्या घटना आपणास ऐकायास मिळतात. परंतु पुण्यातील खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इंग्लिश मीडियम शाळेतील २७ वर्षीय शिक्षिकेने दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी या शिक्षिकेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या आरोपी शिक्षिकेस अटक करण्यात आलीय अशी माहिती मिळाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील आरोपी महिला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. काही महिन्यांपूर्वी तिने दहावीतील १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिने विद्यार्थ्यासोबत शाळेतच लैंगिक संबंध प्रस्थापित केले. मुलाने झालेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर शिक्षिकेस अटक करण्यात आली.
Comments
Post a Comment