ग्रामीण भागातील पाच विद्यार्थ्यांचा सीए परीक्षेत झेंडा

 ग्रामीण भागातील पाच

 विद्यार्थ्यांचा सीए परीक्षेत झेंडा

तीर्थपुरीतील पाच विद्यार्थी सीए परीक्षेत यशस्वी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   ग्रामीण भागातील पाच जणांचा प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत झेंडा फडकवला आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील पाच विद्यार्थ्यांनी सीए परीक्षेत यश संपादन केले आहे. याबाबत नुकताच निकाल हाती आला आहे.


इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे आयोजित नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम परीक्षेत तीर्थपुरीतील पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

1. अनुजा अशोक तोष्णीवाल - अनुजा यांनी प्रगत आर्थिक व्यवस्थापन आणि लेखापरीक्षण या विषयांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.

2. प्रतीक्षा संजय तापड़िया - प्रतीक्षाने योग्य गुणांसह परीक्षेत यश मिळवले आहे.

3. तेजस किशोर मानधानी - तेजस यांनीही परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.

4. रोहित संजय मानधानी - रोहितनेही कठोर अभ्यास करून आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे.

5. शिवराज सुनील बोबडे - शिवराजनेदेखील अंतिम परीक्षेत यश मिळवून आपल्या आई-वडिलांचा अभिमान वाढवला आहे.

  ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी सीएसारख्या प्रतिष्ठित परीक्षेत मिळवलेले यश प्रेरणादायक आहे. त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!