घनसावंगी - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारः नागरिकांमध्ये संतापाची लाट

 घनसावंगी - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारः नागरिकांमध्ये संतापाची लाट


  जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना घडलीय या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  कुंभार पिंपळगांव येथील एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून एका संचालकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला असल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी २५ डिसेंबर रोजी घनसावंगी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आसाराम राऊत असं संशयित आरोपीच नाव असून, याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय

   याप्रकरणी आरोपीला न्यायाल्यात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी सूनाऊन सद्य स्थितीत आरोपी जालना येथे न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास अंबड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक ए. के. ढाकणे करत आहेत.

नागरिकांची मागणीः सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

  या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे. तसेच, महिला पोलिसांनी वेळोवेळी तपासणी करून मुलींशी चर्चा करावी आणि जर काही चुकीचे आढळले तर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कोचिंग क्लासेसना शासनाची परवानगी आहे का, याचीही तपासणी करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.

मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

  कुंभार पिंपळगांवमध्ये घडलेल्या या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर झाला आहे. पोलिस प्रशासनाने अशा घटनांना रोखण्यासाठी तात्काळ आणि कठोर पावले उचलावी, अशी मागणी परिसरातील जनतेकडून केली जात आहे.

अंबडमध्येही अशीच घटना

  दरम्यान याआधीही अंबड येथेही अशाच प्रकारची लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती, यामध्ये टवाळखोरांच्या त्रसाला कंटाळून एका मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते. यामुळे अंबड व घनसावंगी तालुक्यातील व परिसरात मुलींच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!