घनसावंगी- अंबड रोडवरील त्या अपघातात उसाच्या ट्रॅक्टरला धडकून एकजण ठार

घनसावंगी- अंबड रोडवर 

उसाच्या ट्रॅक्टरला धडकून

एकजण ठार !



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   अंबड ते घनसावंगी मार्गावरील मोहापुरी फाट्याजवळ रविवारी रात्री झालेल्या अपघातात उसाच्या ट्रॅक्टरला धडकून एकजण ठार तर एकजण गंभीर जखीम झालंय. दुचाकीवरील दोघेही छत्रपती संभाजी नगर येथील होते. यात प्रवीण रामू गायकवाड यांचा मृत्यू झालाय.

   काल रविवारी रात्री १०:३० वाजता एक भीषण अपघात झाला होता घनसावंगीहून अंबड कडे जात असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून एका दुचाकीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघात एकजण ठार तर एक जण जखमी झालाय.

  दुचाकी क्रमांक mh २० ep ६८६३ वरील छत्रपती संभाजी नगर येथील प्रवीण गायकवाड व आशिक शुक्ला हे दोघे जण अंबड कडे जात होते यावेळी मोहपुरी फाट्याच्या पुढे काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून घडकली यात दोघनाही मार लागल्यामुळे दोघेही बेशुद्ध होऊन रोडवर पडले होते..

 घटनास्थळी उपस्थित लक्ष्मण पवार, नारायण तारगे, बापूराव पवार आणि सुशील देशमुख यांनी तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेतून घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयात हलवले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता प्रवीण रामू गायकवाड यास मयत घोषीत केले.तर अशिक शुक्ला जखमी आहेत त्यांचा वर उपचार चालू आहेत.

  अपघाताची माहिती मिळताच घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक काळे, पोलीस तीकांडे, गोल्डे यांनी दाखल घेत घटनास्थळी दाखल झाले याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोद करण्यात आलीय अशी माहिती ठाणे अंमलदार मोरे यांनी दिलीय.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!