संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल
संतोष देशमुख हत्या प्रकरणात
सीआयडीचे अप्पर पोलीस
महासंचालक बीडमध्ये दाखल
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
संपूर्ण महाराष्ट्र भरात गाजत असलेले व सर्व स्तरातून निषेध वेक्त होत असलेले बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची गुढ आणि तणावपूर्ण चौकशी आता सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. २६ डिसेंबर रोजी राज्याच्या सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल झाले असून, पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस महासंचालकांची बैठक पोलीस कार्यालयात सुरु आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येला अठरा दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र अद्याप तीन आरोपी फरार आहेत. शनिवारी २८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या प्रकरणातील राजकीय तणाव अधिकच वाढला आहे.
या हत्येच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिकी कराड यांच्या कडे संशयाचा इशारा दिला जात आहे, आणि त्यांना अटक होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. पोलीस प्रशासनाने प्रकरणाच्या तपासामध्ये अधिक गती आणली असून, संबंधित आरोपींच्या मागावर विशेष पथके कार्यरत आहेत.
Comments
Post a Comment