ग्रामीण भागातील कलाकाराचा उंच झेंडा, किशोर उढाणला 'सर्वोत्तम कलाकार' पुरस्कार

 ग्रामीण भागातील कलाकाराचा उंच झेंडा, किशोर उढाणला 'सर्वोत्तम कलाकार' पुरस्कार


  जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथील तरुण कलाकार किशोर ज्ञानेश्वर उढाण यांनी आपल्या अभिनय कौशल्याने ग्रामीण भागातील कलागुणांना नवीन उंचीवर नेले आहे. पायपीट फिल्म्स निर्मित 'मुक्ता - आर्टिकल 21' या लघुपटासाठी किशोर उढाण यांची सर्वोत्तम कलाकार म्हणून निवड झाली आहे.


  पहिल्या अभिजात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल मध्ये सन्मानित करण्यात आलेल्या किशोर उढाण यांचे विशेष कौतुक होत आहे कारण या फेस्टिव्हलमध्ये १८० पेक्षा अधिक देश-विदेशातील लघुपट सादर झाले होते. त्यातून ६० लघुपट अंतिम फेरीत निवडले गेले आणि त्यात किशोर यांनी साकारलेली सरांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात विशेष ठरली.


  किशोर उढाण यांनी याआधी "शिवाजी अंडरग्राऊंड भीम नगर मोहल्ला" या लोकप्रिय नाटकात सहकलाकार म्हणूनही काम केले आहे. ग्रामीण भागात राहून शेती व नोकरी सांभाळून आपल्या कलागुणांना त्यांनी जागतिक पातळीवर नेले आहे. आपल्या आवडीला जपण्याचे आणि त्यात प्राविण्य मिळवण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे किशोर उढाण



   त्यांच या यशासाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांचे कष्ट व प्रतिभेचे कौतुक संपूर्ण सिने सृष्टीत होत आहे.




Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!