जालना जिल्ह्यासाठी हवामानाचा इशारा: यलो अलर्ट जारी
जालना जिल्ह्यासाठी हवामानाचा इशारा: यलो अलर्ट जारी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात 26 डिसेंबर 2024 रोजी तुरळक पावसाचा अंदाज असून 27 आणि 28 डिसेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यलो अलर्टच्या अनुसार या दोन दिवसांत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारपीट आणि जोरदार वारे (50-60 किमी प्रतितास वेगाने) होण्याची शक्यता आहे.
या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. प्रमुख सुचनांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
1. मेघगर्जना व विजेच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या: विजेपासून संरक्षणासाठी झाडाखाली थांबणे टाळावे. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचे टाळावे.
2. विद्युत उपकरणे वापर टाळा: गडगडाटी वादळादरम्यान विद्युत उपकरणांचा वापर करू नये व सुवाहक धातूंशी संपर्क टाळावा
3. विद्युत खांब आणि धातुच्या वस्तूंना स्पर्श करू नका: विद्युत खांब, टॉवर्स किंवा धातुच्या कुंपणांपासून दूर राहा.
4. मोकळ्या मैदानात सुरक्षितता जपण्यासाठी पवित्रा घ्या: मोकळ्या मैदानात असल्यास गुडघ्यावर बसून कान झाका व कमीतकमी जमीनीशी संपर्क ठेवा.
5. शेतमालाचे नुकसान टाळा: शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे आणि शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
6. जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवा: जनावरांना सुरक्षित जागी स्थलांतरित करावे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी (02482-223132) अथवा स्थानिक तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना गणेश महाडीक यांनी केले आहे.
Comments
Post a Comment