झोपेतच भाविकांवर काळाचा घाला: ट्रक आणि बसचा भीषण अपघात, दोनजण ठार, ३० जखमी
झोपेतच भाविकांवर काळाचा घाला: ट्रक आणि बसचा भीषण अपघात, दोनजण ठार, ३० जखमी
पंढरपूरजवळ रविवारी पहाटे भटुंबरे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत. हा अपघात भाविकांची बस आणि ट्रक समोरासमोर धडकल्याने झाला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे समोरील भाग अक्षरशः चिरडले गेले.
अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्वरीत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, जखमींना पुढील उपचारासाठी पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघातात बसमधील बेबाबाई महाळसकर (वय ५५) आणि जनाबाई महाळसकर (वय ७) यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळाली.
या अपघातात ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून, यापैकी १२ जण गंभीर आहेत. त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, अपघात कशामुळे झाला याबाबत चौकशी सुरू आहे.
Comments
Post a Comment