मराठवाड्यात २७-२८ डिसेंबरला वादळी वारे, गारपीट व पाऊस; शेतकऱ्यात वाढली धाकधूक !
मराठवाड्यात २७-२८ डिसेंबरला वादळी वारे, गारपीट व पाऊस; शेतकऱ्यात वाढली धाकधूक !
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
हवामान खात्याने २७ व २८ डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या येलो अलर्टमुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या पावसाने आणि गारपिटीने त्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती वाटत आहे. म्हणून २७-२८ डिसेंबरला कही ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज वर्वावला आहे यामुळे घनसावंगी तालुक्यातील शेतकरी चींताग्रस्थ होऊन शेतकऱ्यात धाकधूक वाढली आहे.
प्रमुख हवामान बदलांचा अंदाज व्यक्त करत, हवामान खात्याने म्हटले आहे की, २७ डिसेंबरपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरूवात होईल, आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. यात जालना, संभाजी नगर, हिंगोली, बीड, वाशीम, अकोला, बुलढाणा, अंबाजोगाई इत्यादी जिल्हे असतील. यानंतर २८ डिसेंबर रोजी गारपिटी आणि पावसाचा प्रभाव विदर्भ व मराठवाड्यात जास्त दिसेल अशी शक्यता वर्तवलीय. दरम्यान मागील वर्षी ही अतिवष्टी झाल्यामुळे खरिपाचे पिके पाण्याखाली जाऊन कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते तब्बल १० दिवस खरिपाच्या पिकात पाणी होते. यामुळे या हवामान खात्याने २७-२८ डिसेंबरला वादळी, पाऊस व गारपीटचा अंदाज वर्तवल्याने घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यात धाकधूक वाढली असून शेतकरी चिताग्रस्त बनले आहेत.
शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन
हवामान खात्याने शेतकऱ्यांना अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. खासकरून, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि प्राण्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी उचित व्यवस्थापन करावे. वादळ, गारपीट व पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिके आणि जनावरे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, वादळी हवामानात झाडांच्या खाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली किंवा वीजप्रवाह असलेल्या तारांपासून दूर राहण्याचे सुचवले आहे.
शेतकऱ्यांसाठी पुढील नियोजन
हवामान बदल आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य नियोजन करून या संकटाचा सामना करावा, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. २९ डिसेंबरपासून हवामान स्थिर होईल आणि राज्यभरात थंडीत वाढ होईल, असेही हवामान खात्याने सांगितले आहे.शेतकऱ्यांनी यापूर्वीच हवामानाच्या बदलाच्या दिशेने काळजी घेऊन आपली शेतीची व्यवस्थापन योजना तयार करणे महत्त्वाचे आहे.
Comments
Post a Comment