Posts

Showing posts from August, 2025

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

मराठा आरक्षणासाठी काहींची ठाम भूमिका–काहींची बोलती बंद!

Image
  मंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर मनोजदादा जरांगे पाटील उपोषण करत असताना, राज्य सरकारच्या हालचालींना गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.       या बैठकीत उपस्थित राहून काही मान्यवरांनी मराठा आरक्षणाचा तातडीने तोडगा निघावा आणि मनोजदादांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी ठाम भूमिका मांडली. तर काही मान्यवर बग्याच्या भूमिकेत दिसून आले असून काहींची बोलती बंद झाल्याचे चित्र दिसले.     बैठकीत आंदोलकांच्या मागण्या या समाजाच्या अस्तित्वाशी निगडित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून त्वरीत निर्णय घ्यावा, असा आग्रह सर्वपक्षीय नेत्यांनी धरला.     यात आमदार प्रकाश दादा सोळंके, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार विजयसिंह पंडित, आ संदीप सिरसागर यांनी मराठी आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तसे...

मुंबईत आंदोलनादरम्यान लातुरातील मराठा आंदोलकाचा मृत्यू

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लातुरातील एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. विजयकुमार घोगरे (रा. टाकलगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय अशी माहिती हाती येत आहे.    आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, तिथे राहण्यापासून ते जेवणापर्यंत प्रचंड हाल होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. अशाच प्रतिकूल परिस्थितीत आंदोलनात सहभागी झालेल्या लातुरातील कार्यकर्त्याचा जीव गेला आहे. या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.        विजयकुमार घोगरे हे मराठा आरक्षण लढ्यातील एक बिनीचे शिलेदार मानले जात होते. त्यांच्या निधनाने मराठा समाजाने आणखी एक हिम्मतीचा मोती गमावला आहे. स्थानिक ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना अतिशय वेदनादायी होत्या. निःशब्द... दुर्दैवी घटना... आणखी एक मोती गळून पडला,अशा शब्दांत कार्यकर्त...

वंशावळ समितीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली

Image
२९ ऑगस्ट रोजीचा शासन निर्णय वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या वंशावळ समितीला शासनाने मोठा दिलासा दिला आहे.     या समितीच्या कामकाजासाठी शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केला असून, याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.   पार्श्वभूमी     मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत योग्य वंशावळ नोंदी, पुरावे व तपासणी आवश्यक आहे. या प्रक्रियेतील गुंतागुंत लक्षात घेऊन शासनाने मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. त्यानंतर, तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र वंशावळ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.    या समित्या...

जालन्यात चारचाकी विहिरीत कोसळली

Image
राजूर-टेंभुर्णी रस्त्यावर भीषण अपघात : मृतांचा आकडा वाढण्याची भीती वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालन्यात आज सकाळी एक भीषण अपघात झालाय यात चक्की चारचाकी गाडी विहिरीत कोसळली. राजूर-टेंभुर्णी रस्त्यावरील देळेगव्हाण-गाडेगव्हाण शिवारात आज (२९ ऑगस्ट) पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास एक चारचाकी कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला.   या अपघातात किती जण मृत्युमुखी पडले याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नसली तरी पाच जणांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.     मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई ( गुंगी ) ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर येथील डकले परिवार हे वाहनातून जात होते. अर्धांगवायूग्रस्त रुग्णाला सुलतानपूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना वाचविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट विहिरीत जाऊन पडल्याचे सांगितले जाते.    घटनास्थळी पोलीस, तहसीलदार, तसेच स्थानिक प्रशासनाची यंत्रणा दाखल झाली असून क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत एक मृतदेह बा...

आंदोलनात सहभागी मराठा सेवकांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई आंदोलनात सहभागी झालेले वरपगाव (ता. केज, जि. बीड) येथील सतिष ज्ञानोबा देशमुख (वय ३८) यांचे जुन्नर येथे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच गावात तसेच मराठा समाजात हळहळ व्यक्त होत आहे      सतिषभाऊ आंदोलनात सक्रिय होते व समाजहितासाठी सदैव तत्पर होते. त्यांचे पार्थिव स्वगृही आणले जात असून कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.     चलो मुंबई आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांनी स्वतःच्या आरोग्याची आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, अशी आवाहन करण्यात येत आहे.

आझाद मैदान येथे आमरण उपोषणास परवानगी काय आहेत अटी

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून निघालेल्या आमरण उपोषण आंदोलनाला अखेर मुंबईतील आझाद मैदान येथे सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील परवानगीपत्र आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केले आहे. आंदोलनासाठी नियम व अटी     महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियमावली २०२५ नुसार आंदोलनास परवानगी देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार— आंदोलकांची संख्या कमाल ५ हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी निश्चित करण्यात आली आहे. ध्वनीक्षेपक, गोंगाट करणारी साधने वा प्रचार यंत्रणा वापरण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे. आंदोलनादरम्यान गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा येणार नाही याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृद्ध व्यक्तींना आंदोलनात सहभागी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनादरम्यान अन्न...

गृहनिर्माण अभियंता लाचेच्या जाळ्यात

Image
घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासाठी मागितली होती लाच  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पंचायत समितीचे कंत्राटी गृहनिर्माण अभियंता विशाल विठ्ठलराव कनोजे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (बुधवार) रंगेहाथ पकडले. तक्रारदाराकडून घरकुलाचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपये लाच घेत असताना ही कारवाई करण्यात आली.    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनोजे यास ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल

Image
  काल गेवराईत झाली होती चकमक वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल (२५ ऑगस्ट) ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. या घटनेनंतर गेवराई पोलिसांनी स्वतःहून (सुमोटो) कारवाई करत १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला अशी माहिती मिळाली. यामध्ये हाके यांचाही समावेश आहे. घटनेची पार्श्वभूमी       ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी गेवराई येथे लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. याच दरम्यान आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी चौकात येऊन घोषणाबाजी केली. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर वाद विकोपाला गेला आणि प्रत्यक्ष चकमकीचे स्वरूप धारण केले. राड्यातील घडामोडी     विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलक नेते लक्ष्मण हाकेंच्या अंगावर चपला फेकल्या.    प्रत्युत्तरात हाकेंचे समर्थक गाड्यांवर उभे राहून दांडके दाखवत आक्रमक पवित्रा घेतला.    परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याने तणावाचे वातावरण...

चलो मुंबई साठी घनसावंगी तालुक्यातून १० हजार मराठा बांधवांची उपस्थिती

Image
मराठा आरक्षण लढा:५०० गाड्या शेकडो दुचाकी जाणार वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण          मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई या आंदोलनात घनसावंगी तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभाग होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनासाठी तालुक्यातील ५०० वाहने व साधारणपणे ८ ते १० हजार मराठा बांधव मोटारसायकलसह सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.  या आंदोलनासाठी २७ ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघणार असून २९ तारखेला मुंबई गाठणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातून सरासरी पाच गाड्या पकडल्या जाणार असून संपूर्ण तालुक्यातून किमान ५०० गाड्या व हजारो दुचाक्या मुंबईकडे निघतीलअशी माहिती मिळाली.       घनसावंगी तालुक्यातील या आंदोलनासाठीची पहिली बैठक ३० जुलै रोजी भोगाव येथे झाली होती. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय मोठी बैठक घेण्यात आली. संपूर्ण तालुक्यातील पाच टीम कार्यरत असून जनजागृतीसाठी तीन प्रचार गाड्या अजूनही फिरत आहेत.       घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, श्रीपत धामणगाव, लिंबी, मूर्ती, जांब समर्थ, भेंडाळा, गुंज बु., देवीदहेगाव, लिंबोनी, शिव...

जालना - सहायक पोलीस उप निरीक्षक लाचेच्या जाळ्यात

Image
जालना एसीबीची यशस्वी सापळा कारवाई  बदनापूर पोलीस ठाण्यातील एएसआय सतीश ढीलपे लाचेसह रंगेहात पकडले  वास्तव ओमप्रकाश उढाण        लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) जालना युनिटच्या पथकाने आज यशस्वी सापळा कारवाई करत बदनापूर पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सतीश शशिकांत ढीलपे (वय ५३, रा. हरिगोविंद नगर, जालना) यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.       तक्रारदार हा जालना ते बदनापूर असा ऑटोरिक्षा चालवून उपजीविका करतो. काल (दि.२२ ऑगस्ट) ढीलपे यांनी त्याला थांबवून ऑटोरिक्षावर कारवाई टाळायची असेल तर महिन्याला ३०० रुपये हप्ता द्यावा लागेल अशी मागणी केली होती. पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.     आज (दि.२३ ऑगस्ट) पडताळणी दरम्यान ढीलपे यांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष त्या रस्त्यावर चालणाऱ्या २० रिक्षांचे पैसे आण अशी मागणी केली. त्यावर तक्रारदाराने स्वतः व मित्राच्या दोन रिक्षांचे मिळून ६०० रुपये देण्याचे सांगितले. याला ढीलपे यांनी मान्यता दिली.      यानंतर नविन बसस्टँड, बदनापूर येथे ढीलपे यांन...

जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

Image
जिल्हा परिषद च्या ५७ तर पंचायत समितीच्या ११४ जागांची प्रभाग रचना वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना आज (दि. २२) शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. यानंतर आता जालना जिल्ह्यातील निवडणुकीच्या तयारीला अधिकृत वेग आला आहे.     जालना जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांसाठी मिळून ११४ जागांची प्रभाग रचना करण्यात आली आहे. यामध्ये  भोकरदन : २२ जागा जाफ्राबाद : १२ जागा बदनापूर : १० जागा जालना : १८ जागा मंठा : १२ जागा परतूर : १० जागा घनसावंगी : १४ जागा अंबड : १६ जागा      या अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जालना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये व पंचायत समिती कार्यालयांच्या फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी लावण्यात येणार आहे.     निवडणूक प्रभागांची अ...

निवृत्त मुख्याध्यापकाला तोतया पोलिसांनी लुटले !

Image
सव्वादोन लाखांचे दागिने केले गायब वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील अंबड शहरात बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. यात दिवसाढवळ्या निवृत्त मुख्याध्यापकाला तोतया पोलिसांनी लुटले. मत्स्योदरी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक उत्तमराव विठ्ठलराव शिंदे (वय ७२) यांना दोन तोतया पोलिसांनी दिशाभूल करून तब्बल दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. यामुळे अंबड शहरात एकाच खळबळ उडाली.        शिंदे हे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जालना रोडवरील किराणा दुकानातून सामान घेऊन स्कुटीवरून घराकडे जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांना अडवले. आम्ही पोलीस असून शहरात चोरीच्या प्रकरणानिमित्त वाहने तपासणी सुरू असल्याचे सांगून त्यांनी शिंदे यांची तपासणी केली.       या दरम्यान त्यांनी शिंदे यांना हातातील घड्याळ, खिशातील रोख रक्कम, औषधी, तसेच सोन्याच्या अंगठ्या व लॉकेट एका रुमालात बांधण्यास भाग पाडले. मात्र घरी गेल्यावर रुमाल उघडून पाहता त्यात सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले.      शिं...

ग्रामविकास अधिकारी लाचेच्या जाळ्यात !

Image
रोजगार हमी योजनेतील पाणंद रस्त्याच्या कामाचे बिल देण्यासाठी लाचेची मागणी  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       ग्रामपंचायत च्या एका ग्रामविकास अधिकाऱ्यास २५ हजारांची लाच घेताना रलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरवारी रंगेहाथ पकडले.       घनसावंगी तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायत येथील रोजगार हमी योजनेतील पाणंद रस्त्याच्या कामाचे बिल देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) विजय मोतीलाल शिंदे (वय ५०) यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.      तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे ११ लाख ४० हजार रुपयांचे बिल ग्रामपंचायतीत जमा झाले होते. मात्र, बिलाचा चेक देण्यासाठी शिंदे यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी थेट अँटी करप्शन ब्युरोकडे (ACB) तक्रार दाखल केली.     तक्रारीनुसार पडताळणी केली असता मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज (२१ ऑगस्ट) दुपारी १२.१० वाजता जालना-अंबड रोडवरील अंबड चौ...

प्रेमप्रकरणाच्या संशयातून निर्घृण खून!

Image
  मृतदेह, डोक्याचे आणि मेंदूचे केले तुकडे तुकडे  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रत्ननगर तांड्यात रविवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधाच्या संशयातून मेव्हण्यानेच आपल्या मेहुण्याचा कोयत्याने सपासप वार करून निर्दयपणे खून केला.       मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव भीमराव शिवाजी राठोड (वय २६) असे असून, त्याच्यावर त्याच्याच मेव्हण्या अनिल चव्हाण याने धारदार शस्त्राने वार करून डोक्याचा अक्षरशः चुराडा केला. वार इतके क्रूर होते की मृतदेहाच्या डोक्याचे आणि मेंदूचे तुकडे झाल्याचे पाहून गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले.        घटना रविवार रात्री सुमारे ११ वाजता, जळगव्हाण येथील रामनगर- वंसतनगर तांड्यात घडली असा अंदाज आहे. आरोपी गुन्हा करून फरार झाला असून, परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.     या अमानुष हत्येमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची जो...

जालना - समृद्धी महामार्गावर स्टेफनी बदलताना भीषण अपघात

Image
स्टेफनी बदलताना ट्रकचालक जागीच ठार वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर जालना शहराजवळ तांदुळवाडी शिवारात आज गुरुवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला.      नागपूरकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच-०५, इएल-१८०६) पंक्चर झाल्यामुळे साईडला उभा करून चालक स्टेफनी बदलत असताना पाठीमागून वेगात येणाऱ्या कंटेनरने (क्र. एमएच-४६, बीयू-०९३१) जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकचालक जागीच ठार झाला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.     अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे हवालदार जितेंद्र तागवाले, शंकर रजाळे व जे. एम. कलानी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

मल्टीस्टेट ठेवीदारांना केंद्र सरकारचा दिलासा

Image
  ठेवीदारांच्या परतफेडीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      महाराष्ट्रातील विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमधील ठेवीदारांची व्यथा, त्यांचं दुःख आणि झालेली फसवणूक याविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. बीडपासून दिल्लीपर्यंत ठेवीदारांच्या न्यायासाठी लढा दिल्यानंतर अखेर या लढ्याला यश आलं आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी याबाबत घोषणा केली अशी माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली    यात ज्ञानराधा, जिजाऊ, शुभ कल्याण, जिजामाता आणि राजस्थानी या बहुराज्यीय पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड केली जाणार आहे. दीर्घकाळापासून आपल्या पैशासाठी झगडणाऱ्या ठेवीदारांना हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.   हे पाऊल ठेवीदारांच्या न्यायासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले. आता लढ्याला दिशा मिळाली असून ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळणार, हा विश्वास अधिक बळकट झाला आहे, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले. पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड करण्यात येणार !    ज्ञानराधास...

ऑनलाईन सट्टेबाज गेमवर लोकसभेत बंदी

Image
  नियम मोडल्यास तुरुंगवास आणि कोटींचा दंड : ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांपर्यंत बंदी  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        नवी दिल्ली - पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घालणारं महत्वाचं विधेयक बुधवारी (दि. २० ऑगस्ट) लोकसभेत मंजूर झालं. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन गेम्समुळे वाढलेलं व्यसन, मनी लाँडरिंग आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.     या कायद्यानुसार, आता ऑनलाईन पैशांची बेटिंग करून खेळले जाणारे गेम्स बेकायदेशीर ठरणार आहेत. नियम मोडल्यास संबंधितांना जास्तीत जास्त ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, अशा गेम्सची जाहिरात करणाऱ्या व्यक्ती अथवा कंपन्यांना २ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल.     सरकारने स्पष्ट केलं की, या निर्णयाचा उद्देश युवकांना जुगारासारख्या ऑनलाईन सवयींपासून दूर ठेवणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि जनतेचे आर्थिक हित जपणे हा आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय लवकरच या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठ...

जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार

Image
आज  जलसाठा तब्बल ९५.०५ टक्क्यांवर वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण         पैठणच्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर (उत्तर) पैठण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत धरणातील जलसाठा तब्बल ९५.०५ टक्के इतका झाला आहे.         सध्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने, धरणातील पाण्याची पातळी जलप्रचलन आराखड्यानुसार (Reservoir Operation Schedule) नियंत्रित ठेवणे आवश्यक झाले आहे.        त्यामुळे येणाऱ्या ४८ तासांत कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते, असे या कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयांना कळवले आहे.

घनसावंगी तालुक्यात नदीत शेतकरी वाहून गेला !

Image
  शोधमोहीम सुरू: शोध लागेना! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील एकरूखा येथील वयोवृद्ध शेतकरी अण्णासाहेब कारभारी सानप (वय ७०) हे सोमवारी (दि.१८ ऑगस्ट) दुर्दैवी प्रकारात बहिरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अशी माहिती मिळाली.           घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ तहसीलदार कार्यालयाला संपर्क साधला. यानंतर तहसील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारपासून नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. रात्री उशिरा पर्यंत शोध लागलेला नाही.     गावकऱ्यांनी देखील प्रशासनासोबत शोधमोहीमेत सहभाग घेतला असून, नदीकिनारी मोठी गर्दी उसळली आहे. 

जालना- व्यापाऱ्याचे तब्बल १ कोटी २९ लाख परत मिळवले

Image
  जालना सायबर पोलिसांची मोठी कामगिरी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      सायबर गुन्ह्यांतून त्रस्त झालेल्या व्यापाऱ्याला दिलासा देत जालना सायबर पोलीसांनी तब्बल ₹ १ कोटी २९ लाखांची रक्कम परत मिळवण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई जालना जिल्हा पोलिसांसाठी तसेच जिल्ह्यातील व्यापारी समाजासाठी दिलासा देणारी ठरली आहे.      जालना शहरातील व्यंकटेश ऑईल मिल चे मालक यांनी २६ फेब्रुवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असे नमूद केले होते की, आरोपी कपिल दोषी व यश दोषी (रा. आकोला) यांनी संगनमत करून गुजरातमधील सफल ऑईल अँड सीड्स, अहमदाबाद चे संचालक ललितकुमार जैन तसेच महावीर अॅग्रो, सुरत चे संचालक नरेश शहा यांच्या माध्यमातून ९६ मेट्रिक टन सोया रिफाईन खाद्यतेल पुरवतो असे सांगत फिर्यादीची तब्बल ₹१ कोटी २९ लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.     सायबर पोलीसांनी तांत्रिक तपास करून संशयित आरोपींच्या बँक खात्यांचा मागोवा घेतला. या खात्यांवर तत्काळ कारवाई करून त्यांना गोठवण्यात आले आणि अखेर फस...

महाराष्ट्रात पावसाचा कहर : अनेक जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही भागांना रेड अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टीवर उंच लाटा, समुद्र खवळलेला आणि जोरदार वारे यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेड अलर्ट : मुसळधार पावसाचा इशारा     मुंबई, रायगड जिल्हा तसेच पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसासह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऑरेंज अलर्ट : सावधानतेचा इशारा    पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांतही मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असून, नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्र खवळलेला : उंच लाटांचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रा (INCOIS) ने समुद्रकिनारी जिल्ह्यांसाठी वि...

जालना : ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Image
  मालवाहू ट्रॅक व ॲपे रिक्षाचा झाला अपघात  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील राजुर रोडवरील सुर्या लॉन्सजवळ आज रविवारी घडलेल्या भीषण अपघातात अॅपे रिक्षाला मालवाहू ट्रकने (क्र. आर जे ०१ जी बी ८४८६) जोरदार धडक दिली. या अपघातात अॅपे रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.     मयतांची नावे भरत निवृत्ती खोसे (वय ३३), गणेश तुकाराम बोरसे (वय ३५) आणि सुनिता नारायण वैद्य (वय ३६) अशी असून तिघेही बदनापूर तालुक्यातील मांडवा गावातील रहिवासी होते. ते जालन्याहून मांडव्याकडे अॅपे रिक्षाने जात असताना हा अपघात घडला.     मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने अॅपेला जोराची धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.    या दुर्दैवी घटनेमुळे मयतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. ...

घनसावंगी - गोदावरी नदीत वृद्धाचा बुडून मृत्यू

Image
तीसऱ्या दिवशी आढळले प्रेत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेवता गावाजवळ गोदावरी नदीत ६९ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एकनाथ फकिरबा पवार (वय ६९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.    मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दिनांक ६ ऑगस्ट रोजी घडली होती. अखेर आज, ७ ऑगस्ट रोजी त्यांचे प्रेत गोदावरी नदीत पाण्यावर आल्यावर ते बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.    घटनास्थळी तिर्थपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखल होत पंचनामा केला.

घनसावंगी तिहेरी हत्याकांडाने हादरले !

Image
१) प्लॉटच्या वादातून अंगावर वाहन घालून एकाचा खून २) अनैतिक संबंधाच्या संशयावरून विवाहितेला संपवले ३) दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अवघ्या दोन दिवसाच्या कालावधीत तीन हत्याकांडाच्या घटना उघडकीस आल्या. मंगुजळगाव येथे विवाहितेची पतीने संशयातून हत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बोंधलापुरी गावात दिवसाढवळ्या तरुणाची सार्वजनिक ठिकाणी निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच प्लॉटच्या वादातून अंगावर वाहन घालून एकाचा खून झाल्याची घटना  सुतगिरणी फाट्यावर घडली.  घनसावंगी तालुक्यातील मुंगू जळगाव येथे काल २ ऑगस्ट रोजी पती कांता गुढेकर याने पत्नीवर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ती झोपेत असताना छातीत धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिस निरीक्षक केतन राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.     तर आज ३ ऑगस्ट रोजी संभाजी उंडे हे त्यांच्या वडिलांसह मोटरसायकलवरून अबड गावाकडे जात असताना गावातच अर्जुन वाघमारे यांच्या घराजवळ माज...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या