घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

ऑनलाईन सट्टेबाज गेमवर लोकसभेत बंदी

 नियम मोडल्यास तुरुंगवास आणि कोटींचा दंड : ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांपर्यंत बंदी 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     नवी दिल्ली - पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घालणारं महत्वाचं विधेयक बुधवारी (दि. २० ऑगस्ट) लोकसभेत मंजूर झालं. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन गेम्समुळे वाढलेलं व्यसन, मनी लाँडरिंग आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

    या कायद्यानुसार, आता ऑनलाईन पैशांची बेटिंग करून खेळले जाणारे गेम्स बेकायदेशीर ठरणार आहेत. नियम मोडल्यास संबंधितांना जास्तीत जास्त ३ वर्षांचा तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, अशा गेम्सची जाहिरात करणाऱ्या व्यक्ती अथवा कंपन्यांना २ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल.

    सरकारने स्पष्ट केलं की, या निर्णयाचा उद्देश युवकांना जुगारासारख्या ऑनलाईन सवयींपासून दूर ठेवणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि जनतेचे आर्थिक हित जपणे हा आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय लवकरच या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नियमावली जाहीर करणार आहे.

    कायद्याला विरोध करणाऱ्यांनी मात्र, या निर्णयामुळे गेमिंग इंडस्ट्रीला फटका बसेल आणि रोजगारावर परिणाम होईल, अशी भूमिका मांडली. पण बहुसंख्य सदस्यांनी हे विधेयक युवकांच्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सांगून पाठिंबा दिला. दरम्यान हा जरी कायदा करण्यात येत असेल तरी या कायद्याची कशी अंमलबजावणी होते हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. हे मात्र येणाऱ्या काळात कळेल.

 महत्वाचे मुद्दे 

पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेम्सवर बंदी

नियम मोडल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांपर्यंत दंड

जाहिरातदारांना २ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ५० लाख रुपयांपर्यंत दंड

व्यसन, मनी लाँडरिंग व फसवणूक रोखण्यासाठी पाऊल

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या