घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या. रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

घरकुल लाभार्थ्याने खरोखर घराची नविन बांधनी करूनही अधिकारी लाच मागत असेल तर त्यावर कारवाई आवश्य करावी , पण घर न बांधता घर कुलाचा चेक (रक्कम) काढून घेण्यासाठी जर लाच दिली असेल तर तो देणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार अस माझ मत...!
ReplyDeleteकाहीचे दुकान बंद पडले होते म्हणून काम दाखवले वाटतं
ReplyDelete