घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
या अपघातात किती जण मृत्युमुखी पडले याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नसली तरी पाच जणांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई ( गुंगी ) ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर येथील डकले परिवार हे वाहनातून जात होते. अर्धांगवायूग्रस्त रुग्णाला सुलतानपूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना वाचविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट विहिरीत जाऊन पडल्याचे सांगितले जाते.
घटनास्थळी पोलीस, तहसीलदार, तसेच स्थानिक प्रशासनाची यंत्रणा दाखल झाली असून क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment