घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

मल्टीस्टेट ठेवीदारांना केंद्र सरकारचा दिलासा

 ठेवीदारांच्या परतफेडीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    महाराष्ट्रातील विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमधील ठेवीदारांची व्यथा, त्यांचं दुःख आणि झालेली फसवणूक याविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. बीडपासून दिल्लीपर्यंत ठेवीदारांच्या न्यायासाठी लढा दिल्यानंतर अखेर या लढ्याला यश आलं आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी याबाबत घोषणा केली अशी माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली 

  यात ज्ञानराधा, जिजाऊ, शुभ कल्याण, जिजामाता आणि राजस्थानी या बहुराज्यीय पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड केली जाणार आहे. दीर्घकाळापासून आपल्या पैशासाठी झगडणाऱ्या ठेवीदारांना हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.

  हे पाऊल ठेवीदारांच्या न्यायासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले. आता लढ्याला दिशा मिळाली असून ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळणार, हा विश्वास अधिक बळकट झाला आहे, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड करण्यात येणार !

   ज्ञानराधासह बीड जिल्ह्यातील विविध मल्टीस्टेट पतसंस्थांमध्ये झालेल्या गैरव्यवहारामुळे गोरगरीब जनतेचे कष्टाचे पैसे अडकले होते.

    याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करत हा विषय सभागृहात मांडला याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत केंद्रीय स्तरावर चौकशीची मागणी केली होती.

   आज लोकसभेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी याबाबत मोठी घोषणा करत पतसंस्था विघटित करून लिक्विडेटरमार्फत ठेवीदारांना परतफेड करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या