घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मुंबई, रायगड जिल्हा तसेच पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसासह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांतही मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असून, नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रा (INCOIS) ने समुद्रकिनारी जिल्ह्यांसाठी विशेष इशारा दिला आहे.
मुंबई, उपनगर, ठाणे आणि रत्नागिरी येथे १८ ऑगस्ट रात्री ११.३० वा. ते २० ऑगस्ट रात्री ८.३० वा. दरम्यान ३.५ ते ४.३ मीटर उंच लाटा येणार आहेत.
पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथे १९ ऑगस्ट सकाळी ८.३० वा. ते २० ऑगस्ट रात्री ८.३० वा. दरम्यान ३.५ ते ४.२ मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे.
समुद्रात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार असून, समुद्राची स्थिती अत्यंत खवळलेली राहणार आहे.
समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या कडक सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, नागरिकांनीही किनाऱ्यावर न जाणे आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याचा इशारा लक्षात घेऊन राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, धरणे आणि पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे असे सांगितले.
नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment